अपघात एवढा भीषण होता की हा मुलगा गाडीच्या धडकेमुळे जागीच ठार झाला. याबाबतची माहिती जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांना मिळताच ते आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.
अपघातानंतर मृत मुलाचा मृतदेह अर्धा तास जागेवर पडून होता. पुढील तपास जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत. तसेच या घटने संदर्भात पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
‘अवैधरित्या सुरू असलेल्या गॅरेजवर कारवाई करावी’
वाशिम बायपास घडलेल्या घटनेत लहान मुलाचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे. या विषयाला घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांची भेट घेण्यात आली. स्थानिक वाशिम बायपास परिसरातील अवैधरित्या सुरू असलेल्या गॅरेजवर कारवाई करून येत्या आठ दिवसात परिस्थिती सुधरण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले. यावेळी वाहतूक अधिकारी किनगे यांना सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले. अकोला शहरातील वाहतूक समस्याकडे लक्ष केंद्रीत करावं. जेणेकरून दुर्घटना आटोक्यात येतील. अकोल्यातील वाशिम बायपास, टॉवर चौक अशोक, अशोक वाटिका चौक येथील वाहतूक कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक वाहतुकीवर लक्ष ठेवावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आमदार रणधीर सावरकर यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांची भेट घेतली. वाहतूक अधीक्षक रिंगणे यांना देखील या संदर्भात सूचना दिल्या. तसेच शहरातील अपघात स्थळ म्हणून ओळखले जाणारे मार्गावर तसेच चौकात वाहतूक कर्मचाऱ्यांनी कर्तव्याने पालन करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.