• Sat. Sep 21st, 2024

नवी मुंबईत जाहिरातबाजीसाठी भर उन्हाळ्यात अशोकाच्या ३० झाडांची कत्तल; पर्यावरणप्रेमींचा संताप

नवी मुंबईत जाहिरातबाजीसाठी भर उन्हाळ्यात अशोकाच्या ३० झाडांची कत्तल; पर्यावरणप्रेमींचा संताप

नवी मुंबईः शहरामध्ये राजकीय आणि बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिरातींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले पाहायला मिळतात. मात्र अनेक ठिकाणी ह्या जाहिरातींना झाडांचा अडथळा निर्माण होतो त्यामुळे या जाहिरातींसाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याची घटना वाशीमध्ये घडली आहे.वाशी रेल्वे स्थानकाच्या नजीक, रियल टेक पार्कच्यासमोर तसेच आसाम भवनासमोरील वाशी येथील रस्ता दुभाजकावरील तब्बल ३४ अशोकाची झाडे तोडण्यात आलेली आहेत. ही झाडे वाशी प्रभाग कार्यालयातील नागरी कर्मचाऱ्यांना त्याच दुभाजकावर जाहिरातींसाठी चांगली जागा मिळावी यासाठी एका खासगी जाहिरातदारांनी तोडली असल्याची चर्चा सुरू आहे

दुभाजकावरील अशोकाची झाडे गेल्या पाच वर्षांमध्ये चांगली उंच प्रमाणात वाढली होती. त्यामुळे झाडांच्या उंचीमुळं जाहिरातीचे हॉर्डिंग ठळकपणे दिसत नव्हते. म्हणूनच खासगी जाहिरातदारांनी ही झाडे तोडल्याची चर्चा आहे. दरम्यान, या जाहिरातदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

काळजी घ्या! ४० दिवसांत महाराष्ट्रात उष्माघाताचे ३५७ रुग्ण, पुढील ३ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे
खाजगी जाहिरातदारांनी व बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बेकायदेशीरपणे झाडांचा बळी घेतला, असं पर्यावरण प्रेमींनी म्हटलं आहे. तसेच ह्या वृक्षतोडीसंदर्भात पालिकेला याची कुठल्याही प्रकारची कल्पना दिलेली नसल्याचे समोर आले आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनाही बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत कळवले आहे. खाजगी जाहिरातींना प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. अशी संतप्त भूमिका पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.

अतिक अहमदने जेलमध्येच ठरवलं होतं मुलाचं लग्न, या कुटुंबातील मुलीशी ठरला होता असदचा निकाह
या वृक्षतोडीला जो कोणी जबाबदार असेल त्याच्याविरोधात मी गुन्हा दाखल करणार आहे, असं वाशी वॉर्डातील नवी मुंबई महानगर पालिकेतील सहाय्याक आयुक्त दत्तात्रय घनवट यांनी म्हटलं आहे.

पडक्या गोदामात जन्म; मग स्वीकारण्यास नकार, ७ दिवसांच्या लेकीच्या हातात चिठ्ठी देत आई पसार

कांदळवनाच्या संरक्षणासाठी निसर्गप्रेमी सरसावले; आतापर्यंत जवळपास १ लाख किलो कचरा साफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed