• Mon. Nov 25th, 2024
    बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सहजसोप्या भाषेत, भुऱ्याचं भाषण पुन्हा एकदा व्हायरल

    जालना:काही दिवसांपूर्वी लोकशाहीवर भाषण ठोकून महाराष्ट्रात नाव गाजवलेल्या जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील कार्तिक वजीर यांनी आज शाळेत आयोजित कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. आपल्या त्वेषपूर्ण भाषणाने त्याने आज पुन्हा शाळेचे व्यासपीठ गाजवले. सगळ्यांना प्रेमाचा जय भीम घालून त्याने आपल्या भाषणाची सुरुवात केली. यानंतर भुऱ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती सर्वांना सांगितली. या भाषणात भुऱ्याने आपल्या मजेशीर निरीक्षणंही मांडली. बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असे सांगितले. पण आम्ही शिकायला तयार नाही, शिकलो तरी संघटित होत नाही, संघटित झालो तरी संघर्ष करण्यास घाबरतो, असे भुऱ्याने म्हटले. तसेच बाबासाहेब आंबेडकर हे १८-१८ तास अभ्यास करायचे. मला तर चार तासही अभ्यास करवत नाही, या भुऱ्याच्या वाक्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. भुऱ्याचे हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

    यापूर्वी कार्तिक वजीर उर्फ भुऱ्याचे लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगणारे भाषणही व्हायरल झाले होते. लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता. भांडू शकता, दोस्ती करू शकता, प्रेमाने राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला, खोड्या करायला, रानात फिरायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते. असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत. कारण ते लोकशाही मानतात, अशा शब्दांत भुऱ्याने लोकशाहीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.

    लोकशाहीची व्याख्या सांगणाऱ्या चिमुकल्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल, थेट CMO मधून व्हिडीओ कॉल

    भुऱ्याच्या डोळ्यांची तात्याराव लहानेंकडून तपासणी

    लोकशाहीवरील भुऱ्याच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची प्रचंड चर्चा झाली होती. यावेळी भुऱ्याच्या डोळ्यात व्यंग असल्याची माहिती समोर आली होती. ही गोष्ट समजल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. या बातमीची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली होती. यानंतर तातडीने हालचाली झाल्या आणि भुऱ्याला वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. काही दिवसांपूर्वीच राज्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांनी मंगळवारी कार्तिक वजीर उर्फ भूऱ्याच्या डोळ्यांची तपासणी केली होती.

    होता भीमराव लै दिलदार, त्याने फुकट दिलंया सारं, दादरच्या अंध कलाकाराचं मन मोहून टाकणारं बासरीवादन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed