हा बैल नदीमध्ये उतरताच नदीच्या पात्रात आसपास असणाऱ्या मगरींचे लक्ष या बैलाकडे गेले.यानंतर अक्षय आणि आसपासच्या नागरिकांना धडकी भरली. मग या बैलाला नदीतून बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न सुरू केला. मात्र भीतीने बैलाने नदीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूच्या पात्राकडे पाण्यातून प्रवास सुरू केला. तसा या बैलाच्या मागे तीन-चार मगरींनी त्याचा पाठलाग सुरू केला.
मगरी जवळ जायच्या आणि बैल त्यांना चकवा देऊन पुढे जायचा असा खेळ तब्बल चार तास कृष्णा नदीच्या पात्रात सुरू होता. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बैलाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आणि मगरीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी अक्षय व त्याच्या इतर मित्रांनी आणि धाडसी नावाडी चालकांनी प्रयत्न सुरू केले होते. बैल हा मगरींना घाबरून किनाऱ्याच्या बाजूला एका कोपऱ्याच जाऊन उभा राहिला. मगरींच्या भीतीने बैल जागेवरुन हलायला तयार नव्हता. अखेर मगरींच्या तावडीत बैल सापडण्याच्या आधी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बैलाला चुचकारुन कृष्णा नदीच्या दुसऱ्या बाजूने पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले आणि सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला. गावातील तरुण आणि नावाड्यांनी वेळीच धाडस करुन हालचाली केल्यामुळे या बैलाचा जीव थोडक्यात वाचला.
Sangli News : पुरानंतर आता मगरी पुन्हा नदीकडे वळू लागल्यानं सांगलीकरांमध्ये दहशत