पिंपळनेर येथील उक्कडगाव परिसरातील गणेश आठवले यांची कुक्कडगाव शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतात विहीर असून या विहिरीमध्ये गुरुवारी सायंकाळी एक मृतदेह असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. नागरिकांनी तात्काळ पिंपळनेर पोलीस ठाण्यात याविषयी माहिती दिली. याविषयी माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख कैलास भारती पीएसआय खरात, अंमलदार मेखले यांनी धाव घेतली.
गर्दीचा फायदा घेत चोरानं अवघ्या 2 मिनिटांत दुकानं लुटलं; लाखोंची रोकड लंपास,घटना सीसीटीव्हीत कैद
मृतदेह तात्काळ विहीरीच्या बाहेर काढण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ती अंदाजे ३० ते ३२ वर्षांची महिला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या महिलेचा गळा चिरुन विहिरीत टाकून दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही महिला कोण, तसंच ती कुठली आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र मृतदेह पाहून एक दिवसापूर्वी हा मृतदेह या विहिरीत टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या ३० ते ३२ वर्षीय महिलेची ओळख पटवण्याचं आव्हानात्मक काम पोलीस प्रशासनासमोर आहे. या घटनेनंतर कोकरवाडी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून या घटनेची सर्वत्र चर्चा आहे.
जोपर्यंत या महिलेचा तपास लागत नाही तोपर्यंत ही हत्या कोणी केली, का केली, ही महिला कोण आहे हे शोधून काढणं पोलिसांसमोर आव्हान आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून लवकरच या हत्येचा उलगडा केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात दिवसेंदिवस हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हत्येच्या घटनांचा उलगडा करणं, तसंच गुन्हेगारांचा शोध घेणं पोलिसांसमोर हे एक मोठं आव्हान निर्माण होत आहे.