• Sat. Sep 21st, 2024

संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पाच दिवस साताऱ्यात, वारकऱ्यांचा उत्साह शिगेला

संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पाच दिवस साताऱ्यात, वारकऱ्यांचा उत्साह शिगेला

सातारा :संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी रविवार, दि. ११ जून २०२३ रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. यावर्षी सातारा जिल्ह्यात एकूण पाच मुक्काम असणार आहेत. यावर्षी लोणंदमध्ये दोन, तर फलटण तालुक्यात तीन मुक्काम होणार आहेत, अशी माहिती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा संस्थेच्या माऊलींचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार यांनी दिली. सातारा जिल्ह्यात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात पाच दिवस मुक्काम मुक्कामाला असल्यामुळे लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे भक्तांचा मेळा पाहण्यास मिळणार आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा संस्थेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार रविवार, दि. १८ जून २०२३ रोजी पालखी सोहळा नीरा स्नान व आरती होईल. त्यानंतर सातारा जिल्ह्यात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होईल. पाडेगाव येथे सातारा जिल्ह्याच्या वतीने स्वागत केल्यानंतर रात्री लोणंद येथे हा सोहळा मुक्कामी राहील. दुसऱ्या दिवशी सोमवार, दि. १९ जून रोजी पालखी लोणंद येथेच मुक्कामी असणार आहे.

लोणंद येथील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर मंगळवार, दि. २० जून रोजी पालखी सोहळा तरडगाव (ता. फलटण) येथे मुक्कामाला प्रस्थान करेल. दुपारी चारच्या दरम्यान दिवशी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल. त्यानंतर तरडगाव येथे ज्ञानेश्वर पालखीचा मुक्काम राहील.बुधवार, दि. २१ जून रोजी पहाटे पाच वाजता फलटणकडे प्रस्थान करेल. दत्त मंदिर काळज, सुरवडी, निंभोरे ओढा, वडजल येथे विसाव्यासाठी पालखी काही वेळ थांबेल. त्यानंतर सायंकाळी सोहळा पालखी फलटण विमानतळावर मुक्कामी असेल. दि. २२ जून रोजी पालखी सोहळा बरडला प्रस्थान करेल. या मार्गावर विडणी, पिंपरद, निंबळक फाटा येथे विसावा घेतल्यानंतर तो बरडकडे मुक्कामासाठी मार्गस्थ होईल. बरड मुक्कामानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान करेल. साधूबुवाचा ओढा येथे दुपारचा विसावा झाल्यानंतर बरडच्या सीमेवर धर्मपुरीजवळ पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागत केल्यानंतर पालखी सोहळ्याचा कारुंडेकडे प्रस्थान करेल.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे देवाचे आळंदी येथील संस्थांच्या वतीने वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याने दिंडी चालक-मालक यांची तयारी सुरू असल्याचे दिसत. माउलींचा पालखी सोहळा यावर्षी मोठा होणार असल्याने वारकरी भक्ताचा अंदाज आहे. त्यामुळे भाविक वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे.

गॅरेजमध्ये पाणी मारताना कोसळला, सगळ्यांचंच दुर्लक्ष झाल्यानं तरुण दीड तास पडून; अखेर…

अनेक वारकरी या सोहळ्यात सामील होण्यासाठी तयारी करू लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही दिंडी चालक- मालकांना आरोग्यविषयी सर्व सूचना देण्यात आल्या आहेत, असे चोपदार यांनी सांगितले. पंढरपूर येथील गोपाळकाल्याच्या कार्यक्रम होऊन पालखीचा ३ जुलै रोजी पुन्हा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. सातारा जिल्ह्यात परतीच्या प्रवासात सहा जुलैला फलटण तर पाडेगाव येथे सात जुलै पालखीचा मुक्काम राहणार आहे.

सातारा-जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढली, अजितदादांच्या उपस्थितीत अमित कदमांची घरवापसी

– जिल्ह्यात ज्ञानेश्वर पालखी सोहळा मुक्काम वेळापत्रक

रविवार, दि. १८ जून रोजी पालखी सोहळा नीरा स्नान. त्यानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश, रात्री लोणंद येथे सोहळा मुक्काम

सोमवार, दि. १९ जून रोजी पालखी लोणंद येथे मुक्काम

मंगळवार, दि. २० जून रोजी पालखी सोहळा तरडगाव येथे मुक्काम. या दिवशी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण.

बुधवार, दि. २१ जून रोजी फलटण येथे पालखी सोहळा मुक्काम. यादरम्यान सुरवडी, निंभोरे, वडजल येथे काही वेळ विसाव्यासाठी पालखी थांबा

गुरुवार, दि. २२ जून रोजी पालखी सोहळा बरड मुक्काम. दुसऱ्या दिवशी २३ रोजी सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळ्याचा प्रवेश होईल.

सगळं कुटुंब राबलं पण मार्केट पडलं, वांगी विक्रीवेळी दर घसरले, अखेर शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं

करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव; १५०० किलो वजनाचा दुमजली रथ अन् लाखोंच्या संख्येनं भाविक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed