• Sat. Sep 21st, 2024

शेतीने निराश केले, कुक्कुटपालनाकडे वळले; अवकाळी पावसाचा कहर अन् एका क्षणात सारं उद्ध्वस्त

शेतीने निराश केले, कुक्कुटपालनाकडे वळले; अवकाळी पावसाचा कहर अन् एका क्षणात सारं उद्ध्वस्त

नाशिक:जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गाव पाड्यांवरील अनेक घरांचे छप्पर उडून घरातील अन्नधान्य आणि संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पोल्ट्री शेडचे मोठे नुकसान झाले आहे. पोल्ट्री शेड कोसळल्याने त्याखाली दबून हजारो कोंबड्या मृत पावल्या आहेत.जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता. यासाठी अनेकांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून पोल्ट्री शेड उभारले होते. दोन पैसे मिळण्याच्या अपेक्षेतून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. परंतु, अवकाळी पावसाने या सगळ्यावर पाणी फेरलं. पेठ तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसायिक जयराम भोये, रामचंद्र भोये, मंगेश इंपाळ या शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने पोल्ट्री शेड कोसळून जमीनदोस्त झाला आहे. यामुळे कोसळलेल्या पोल्ट्री शेड खाली दबून ज्ञानेश्वर भोये यांच्या पोल्ट्रीतील सुमारे १३ ते १४ हजार पक्षी मृत्युमुखी पडले. तर मंगेश इंपाळ यांचे अंदाजे साडेचार हजार पक्षी मृत्य पावले आहेत

nashik poultry farm

बे – मोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. गहू हरभरा, कांदा, टोमॅटो, द्राक्ष ,आंबे , पपई , टरबूज कोबी यांसारख्या अनेक शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर जनावरांसाठी काढलेला चाराही भिजल्याने शेतकरी अधिकच कोंडीत सापडला आहे. उद्या काही दिवसात काढण्यासाठी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवरच पाणी फिरले आहे. नागरिक राहत असलेल्या घरांमध्ये छप्पर देखील उडून गेल्याने आता नेमका आधार कुणाकडे मागावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे.

आरोग्यदायी द्राक्षं, पुण्यातील कानडे बंधूंचा भन्नाट प्रयोग; वादळी वाऱ्यातही बहरतं पीक

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात झालेल्या गारपिटीच्या पावसानं शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. काही ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा हा ओला झाल्याने फेकण्याची वेळ आली आहे. तर काही ठिकाणी थेट गारपिटीमुळे पिकच झोपून गेली आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा गारपिटीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यातील दक्षिणेकडील भागात असलेल्या कुळवंडी आभेटी भरडापाडा अंमलोन शिवखंडी नाचलोंडी गावंद पळशी घनशेत ससुने शीगदरी या गावांना गारपिटीने झोडपून काढले आहेत.

नववीत नापास झाला, गावाबाहेर जाऊन व्हिडिओ बनवला, म्हणाला – मला आता या जगात राहायचे नाही, अन्

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed