तालुक्यातील पुसेसावळी – कडेपूर रस्त्यावरील गोरेगाव वांगी येथील (माने वस्ती) येथे हा अपघात झाला.याप्रकरणी दादासो विष्णू घागरे यांनी औंध पोलिस स्टेशनला उशीरा तक्रार दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
वाई तालुक्यात करंजाचे झाड दुचाकीवर पडल्याने दुचाकीस्वार ठार
तर दुसऱ्या घटनेत वाई तालुक्यातील जोर रस्त्यावर एकसर गावच्या हद्दीत मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास अचानक करंजाचे झाड दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीस्वार सोमनाथ प्रदीप रोकडे (रा. नानेगाव, ता. सातारा. सध्या फुलेनगर वाई) हा जागीच ठार झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या डॉ. प्रज्ञा स्वप्नील गायकवाड यांनी ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्य झाला.
सुरेखा बढे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. दोघेही वाई औद्योगिक वसाहतीत एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. सोमनाथ हा सुरेखा बडे यांना घरी सोडण्यासाठी चिखलीला जात होता. यावेळी ही दुर्घटना घडली. रस्त्यावर झाड आडवे पडल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. काही वेळातच झाड काढून वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली असून या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.