हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कारण या फोटोत नरहरी झिरवळ हे त्यांच्या पत्नीसोबत दिसत आहेत. अगदी परदेशात जातानाही मिस्टर अँड मिसेस झिरवळ यांनी आपला साधेपणा सोडला नाही. या फोटोत नरहरी झिरवळ हे त्यांच्या नेहमीच्या सदरा-लेंगा आणि डोक्यावर गांधी टोपी अशा पेहरावात होते. तर त्यांच्या पत्नीने हिरव्या रंगाचं नऊवारी लुगडं नेसलं होतं. एरवीदेखील नरहरी झिरवळ हे त्यांच्या साध्या राहणीसाठी ओळखले जातात. आता परदेशात जातानाही झिरवळ आणि त्यांच्या पत्नीने आपला साधेपणा जपला, आपली पारंपारिक ओळख घेऊनच परदेशात गेले, यासाठी अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत. त्यामुळे झिरवळ दाम्पत्याचा हा हसतमुख फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विधिमंडळाच्या २१ सदस्यांचे शिष्टमंडळ जपानमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी गेले आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप तसेच शिवसेना अशा सर्वपक्षीय आमदारांचा समावेश आहे. हा जपान दौरा ११ ते २१ एप्रिलदरम्यान पार पडणार आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे , माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, श्वेता महाले, राजहंस सिंह, रमेश पाटील, ज्ञानराज चौगुले, किशोर पाटील, मनिषा कायंदे, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, चेतन तुपे, विक्रम काळे, लहू कानडे, संजय जगताप, बळवंत वानखेडे, जयंत आसगांवकर आणि क्षितीज ठाकूर या सर्वांचा शिष्टमंडळात समावेश आहे.
हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; ३० क्विंटल गहू, १५ क्विंटल तांदूळ, बूंदी,पहाटेपासून महाप्रसादाला सुरुवात