• Sat. Sep 21st, 2024
प्रेमी युगुलाला अडवलं, प्रियकराच्या बरगडीत गोळी झाडली, नांदेडमधील घटनेचं गूढ अखेर उकललं

नांदेड : नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी एका प्रेमी युगुलावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल देखील जप्त केले आहे. ३ एप्रिल रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास असदवन शिवारात गोळीबाराची घटना घडली होती.हिंगोली येथील शुभम दत्तात्रय पवार हा युवक आपल्या प्रेयसीसोबत असदवन शिवरातील निर्मनुष्य रस्त्यावरून जात होता. असदवन शिवरातील पाण्याच्या टाकीजवळ आरोपी राजेंद्र अरुणसिंह ठाकुर (वय ३२ वर्षे, रा. आकाशनगर, असदवन विष्णुपुरी) अतिष जिवनसिंह ठाकुर (वय २२ वर्षे, रा. आकाशनगर, असदवन विष्णुपुरी) आणि श्रीपाद ऊर्फ पियुष पसुधाकर कदम (वय १९ वर्षे, व्यवसाय बेकार रा. बहर्जीनगर, वसमत जि. हिंगोली ह. मु., आकाशनगर, असदवन विष्णुपुरी) अंधारात लपून बसले होते.

तिघांनी त्या प्रेमी युगुलाला अडवले आणि पिस्टलचा धाक दाखवून शुभमच्या जवळील सोनसाखळी आणि पैसे बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर त्या आरोपींनी शुभमच्या मैत्रिणीसोबत असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली. तेव्हा शुभम पवार याने विरोध केल्याने आरोपींनी त्याच्यावर गोळी झाडली. ती गोळी बरगडीत लागल्याने शुभम जखमी झाला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

मला चांगल्या पगाराची नोकरी, पण मन लागत नाही; पिंपरीत २७ वर्षीय अभियंत्याने आयुष्य संपवलं
सदरच्या प्रकरणात आरोपींना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. पोलिसांचे वेगवेगळे पथक नेमण्यात आले होते. अखेर मंगळवारी हे तिन्ही चोरटे ग्रामीण पॉलीटेकनिक कॉलेज ते वाघाळा रस्त्या जवळील पाण्याच्या टाकीखाली बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

घरमालकासोबत बायकोचे अनैतिक संबंध, भाडेकरूने साथीदारासोबत काढला काटा

पोलिसांनी तात्काळ तिघांना ताब्यात घेऊन गुन्हात वापरलेली पिस्टल देखील जप्त केली आहे. आरोपींनी अश्या प्रकारे किती गुन्हे केलेत आणि पिस्टल कुठून आणली याचा तपास पोलीस करत आहेत.

पप्पांनी पंखे पुसताना सूसू केली, चिमुकल्याने दादाला सांगितलं; नंतर समजलं बँक मॅनेजरने गळफास घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed