• Sat. Sep 21st, 2024
चालकाचं नियंत्रण सुटताच बस पलटली, पहाटे भीषण अपघात, प्रवासी गाढ झोपेत; मोठा अनर्थ टळला…

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा येथे सुरत – खरगोन बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हाइडरला धडकली आणि पलटी झाली. बसमधील १५ प्रवासी जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील सुरतयेथून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या सुरत – खरगोन बसचा नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील १३२ केवी सब स्टेशनजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. अपघातात बस पलटी होऊन १५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर शहादा शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येत आहे.

चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोलीच्या दोन लोकल फेऱ्या रद्द, कारण…
पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आवाज झाला आणि प्रवाशांनी मदतीची याचना करण्यासाठी गोंगाट केल्याने स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी मदतीसाठी धाव घेतली. उलटलेल्या बसमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुंबईच्या वीजमागणीचा पुन्हा उच्चांक; राज्याची मागणी २४, ५०० मेगावॉटहून अधिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed