• Sat. Sep 21st, 2024
लक्झरी बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला, बीड-परळी रोडवर मध्यरात्री रंगला थरार

बीड: बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटल्यानंतर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बीडमध्ये भीषण अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. दिंद्रुड नजीकच्या परळी-बीड महामार्गाच्या परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रसंग घडला. याठिकाणी एका बसमधून ३० जण प्रवास करत होते. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे ही बस भरधाव वेगात होती. अशातच बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. स्टेअरिंग तुटल्याने बस अनियंत्रित होऊन अपघात होण्याची भीती होती. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे गाडीतील ३० जणांचे जीव थोडक्यात वाचले.

स्कूल बसचा पाटा तुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं, झाडाला धडकताच बस उलटली; भीषण अपघातात ३० विद्यार्थी जखमी

सध्या अनेक प्रवासी लांबचा पल्ला असेल तर एसटी महामंडळ ऐवजी खासगी बसचा वापर करतात. मात्र, यामध्ये प्रवाशांचा जास्त ओघ असल्याने हे खाजगी बस मालक आपल्या गाड्यांकडे जास्त लक्ष देत नाहीत. फक्त पैसा कमावण्याच्या नादात गाडी नादुरुस्त असतानाही प्रवासी घेऊन जाण्याचे धाडस हे खाजगी बस चालक करत आहेत. आतापर्यंत अनेकदा या बस नादुरुस्त असल्याने अपघात झाल्याचे कित्येक वेळा समोर आले आहे. अशीच एक घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. नांदेड येथील एका खाजगी ट्रॅव्हल्सची बस पुण्याला जात होती. प्रवासी घेऊन जात असताना दिंद्रुड परिसरात बीड परळी रोडवर अचानक गाडीच्या स्टेअरिंग रॉड तुटल्याचं ड्रायव्हरच्या लक्षात आले.

पुण्यात एसटीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी उलटली, एकाचा मृत्यू

यावेळेस ड्रायव्हरच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र यावेळेस ड्रायव्हर प्रसंगावधान दाखवून ब्रेकचा वापर करत गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घालून त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही गाडी इतरत्र कुठे पलटी झाली असती तर या गाडीतील ३० ही प्रवासी दगावण्याची शक्यता होती. चालकाने प्रसंगावधान दाखवून प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. मात्र यानिमित्ताने खासगी ट्रॅव्हल्स बसेसच्या तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. किती बसेस नादुरुस्त आहेत आणि प्रवाशांना घेऊन जाण्याच बसेसची क्षमता याची देखील पडताळणी होणे गरजेचे असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed