• Sat. Sep 21st, 2024

वाघ, पेग्विंग अन् बरंच काही…; फक्त ५० रुपयांत करा राणीच्या बागेची सैर, असं करा ऑनलाइन बुकिंग

वाघ, पेग्विंग अन् बरंच काही…; फक्त ५० रुपयांत करा राणीच्या बागेची सैर, असं करा ऑनलाइन बुकिंग

मुंबईः उन्हाळ्याच्या सुट्ट्यां लागल्या की लहान मुलांचे पाय आपोआप उद्यानात नाहीतर प्राणीसंग्रहालयात वळतात. भायखळा येथील वीर जीजामाता उद्यानातही पर्यटकांनी अलोट गर्दी केली आहे. राणीबाग मुंबईबाहेरील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र तर आहेच त्याचबरोबर मुलांना लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमुळंही राणीच्या बागेत पर्यटकांची संख्या वाढली आहे. शिवाय गेल्या नोव्हेंबरपासून ऑनलाइन तिकिट विक्रीची पर्याय खुला करण्यात आल्यापासून अधिकाअधिक पर्यटक ऑनलाइन पर्यायाचा वापर करत आहेत. १५ टक्के पर्यटक ऑनलाइन पद्धतीने तिकिट काढतात. शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांची अलोट गर्दी असते. तिकिटांसाठी रांगेत उभं राहावं लागतं. अशावेळी ऑनलाइन पद्धतीने तिकिट काढल्याने रांगेत उभं राहण्याच्या त्रासापासून सुटका होते. https://themumbaizoo-ticket.mcgm.gov.in/ या वेबसाइटवरुन पर्यटक तिकिट बुक करु शकतात. १९ नोव्हेंबर २०२२ ते ९ एप्रिल २०२३ या कालावधीत ११.९ लाख तिकिटे ऑफलाइन पद्धतीने विकण्यात आले आहेत. तर, २.१ लाख तिकिटांची ऑनलाइन पद्धतीने विक्री झाली आहे. ऑनलाइन तिकिट विक्रीची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडियावरही अभियान राबवण्यात आले आहे. तर राणीच्या बागेत क्युआर कोडही लावण्यात आले आहेत. ते स्कॅन करुन तिकिट काढता येणार आहे.

पुणेकरांसाठी गुडन्यूज! आता घरबसल्या काढता येणार पीएमपीचे तिकीट, अशा असतील सुविधा
राणीच्या बागेतील मुख्य आकर्षण

वाघ


राणीच्या बागेतील वाघ हे मुख्य आकर्षण आहे. वाघासाठी कृत्रिम तलावही तयार करण्यात आला आहे. कित्येकदा या तलावात वाघ पोहताना दिसतो. तलावात वाघ पोहोतानाचे दृष्य दिसणे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच असते.

पेंग्विन

राणीच्या बागेत पेंग्विनही आहेत.

पक्षी-झाडे

विविध प्रकारची पुरातन झाडे, वेगवेगळे प्राणी, पक्षी, कासवे , साप, असे अनेक प्रकारचे पशुपक्षी आहेत

नवी मुंबईकरांना उन्हाळ्यात गारेगार प्रवासाची संधी?; मेट्रो१ लवकरच धावणार, स्थानके व तिकिट दर जाणून घ्या
असे आहे तिकिटाचे दर

चार जणांचे कुटुंब- १०० रु (आई, वडिल आणि दोन मुलं, तिसऱ्या अपत्यासाठी अधिकचे २५ रुपये भरावे लागणार)
प्रौढ- ५० रुपये
परदेशी पर्यटक- ४०० रुपये
खासगी शाळेतील विद्यार्थी- १५ रुपये
ज्येष्ठ नागरिक- मोफत
तीन वर्षाखालील मुलं- मोफत
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी- मोफत

लाखो भक्तांच्या गर्दी, गुलालानं न्हाऊन निघालेल्या जोतिबा डोंगराची ड्रोन दृश्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed