• Sat. Sep 21st, 2024
रात्री घराबाहेर पडला,दोन पानांची नोट लिहिली,साताऱ्यात कामगारानं उचललं टोकाचं पाऊल,तपास सुरु

सातारा : दोन पानी सुसाईड नोट लिहून ठेवून वडूज – कातरखटाव रस्त्यावरील एका दुकान गाळ्यात लोखंडी गजाला गळफास घेत गॅस गाडीवरील कामगाराने जीवन संपवले. पेडगाव येथील ज्ञानदीप ऊर्फ संदीप विलास डोईफोडे (वय ४२) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटवरून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुळचे पेडगाव येथील ज्ञानदीप डोईफोडे हे एका गॅस कंपनीच्या गाडीवर कामगार म्हणून काम करत होते. वडूजमधील विठ्ठलनगर परिसरात पत्नी, दोन मुलांसह वास्तव्यास होते. काल, रविवारी सायंकाळी उशिरा ते घराबाहेर पडले होते. सोमवारी सकाळी नातेवाईकांनी शोधाशोध केली. तेव्हा वडूज- कातरखटाव रस्त्यावरील एका फार्म हाऊस शेजारील दुकान गाळ्यातील लोखंडी पाईपला गळफास घेत त्यांनी जीवन संपवल्या स्थितीत आढळले.

संदीप डोईफोडे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवली. माहिती मिळताच घटनास्थळी वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुले, प्रशांत हांगे, आनंदा कदम आदी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी घटनास्थळी दोन पानी सुसाईड नोट मिळाली. या सुसाईड नोटवरून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून टोल, राजापूरमधील टोल नाका सुरू करण्याची जय्यत तयारी

या घटनेबाबत शेजारी व गॅस कंपनीत चौकशी करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून जाबजबाब, पंचनामा करण्यात आले. पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वडूज ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस तपासानंतर आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

काळीज पिळवटून टाकणारी घटना: लहान भावाच्या मृत्युचा धक्का; दादानेही ५ मिनिटांत श्वास सोडला

गेल्या महिन्याभरात दहा ते बारा शालेय विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद आहेत. आज एका कामगाराने दोन पानी सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, या सुसाईड नोटमधील पोलिसांकडून तपशील समजलेला नाही. पोलीस तपासानंतर आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed