• Sat. Sep 21st, 2024
अवकाळी पावसाचा साखर उद्योगालाही फटका;  हंगाम संपला, साखर उत्पादनात झाली घट

Decrease in sugar production : यंदा उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. हे लक्षात घेता यंदा साखर उत्पादन उच्चांकी होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र साखर उत्पादनाला मोठा फटका बसला.

 

Decrease in sugar production
साखर उत्पादनात झाली घट
कोल्हापूर : गतवर्षी साखर उत्पादनात झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रात यंदा मात्र ज्यादा ऊस असूनही साखरेचे उत्पादन तब्बल २९ लाख मेट्रिक टनाने कमी झाले आहे. अवेळी पडलेल्या पावसाचा हा दणका मानला जातो. साखर उताऱ्यालाही मोठा फटका बसला. महाराष्ट्रातील २१० पैकी २०४ साखर कारखान्यांचा हंगाम संपला. यंदा उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे साखर उत्पादन उच्चांकी होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र साखर उत्पादनाला मोठा फटका बसल्याचे हंगाम संपल्यानंतर आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

युद्धनौकेवर युद्धसराव सुरू असताना मोठा अपघात, अरबी समुद्रात नौसैनिकाचा मृत्यू
यंदा १०५१ लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप या हंगामात झाले. त्यामध्ये १०८ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले. यंदा साखर उतारा ९.९८ असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र अधिक असल्याने गेल्यावर्षी १३७ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते. देशात सर्वाधिक साखर उत्पादन करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला होता. याशिवाय भारतानेही जगात उच्चांकी साखर उत्पादन केल्याने सहकाराच्या इतिहासात नवे रेकॉर्ड नोंदवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर क्षेत्र वाढल्याने यंदाही हा रेकॉर्ड होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र साखर उत्पादनाला मोठा दणका बसल्याचे स्पष्ट झाले.
World’s Biggest Bigamist: ३२ वर्षांत केली १०५ लग्ने, घटस्फोट न घेता बनला १४ देशांचा जावई
सहकार आणि साखर अभ्यासक पी.जी. मेढे यांनी सांगितले की यंदा उसाचे क्षेत्र अधिक असल्यामुळे साखर उत्पादन वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात उत्पादनाला मोठा दणका बसला आहे. शिवाय उताराही कमी झाला आहे. याचा कारखान्याच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे.

यंदा अवेळी पडलेला पाऊस आणि उसाच्या वाढीवर झालेला परिणाम यामुळे साखर उत्पादनावर परिणाम झाला आहे.

विजय औताडे, साखर अभ्यासक

एसटी बस चालवताना चालक फोनवर बोलू लागला, प्रवाशांना भरली धडकी… व्हिडिओ झाला व्हायरल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed