दरम्यान, दोघेही प्रतिसाद देत नसल्याने राव यांनी सदर पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन विभागालाही कळविले. माहिती मिळताच सदर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केले. सदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
खून झाल्याचा आरोप
तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळताच दोघांच्याही नातेवाईकांनी तात्काळ राज नगर गाठले. रडून सगळ्यांची अवस्था वाईट झाली होती. मृत तरुणांपैकी एक विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. या घटनेनंतर नातेवाईकांनी परिसरामध्ये एकच गोंधळ घातला. दोन्ही तरुणांची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, सकाळी त्यांचे दोन्ही युवक येथे विहीर साफ करण्याचे यंत्र घेऊन काम करण्यासाठी आले होते. मग दोन तासात त्याचा मृत्यू कसा झाला? असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला.
एकमेव कमावणारा होता
मृत तरुणांपैकी एकाची आईने काळीज चिरणारा हंबरडा फोडला होता. “सकाळी तिचा मुलगा आपल्या साथीदारासोबत कामासाठी आला होता. दोन तासांनंतर विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे आम्हाला सांगण्यात आलं. तो घरचा एकमेव कमावता होता. तर आता तो गेल्यावर आमची काळजी कोण घेणार?”