• Mon. Nov 25th, 2024
    प्रियकराकडून फोटो व्हायरल करण्याची धमकी अन् जळगावात अल्पवयीन मुलीची आयुष्याची अखेर

    जळगाव: अल्पवयीन मुलगी आणि तरुणामध्ये प्रेमसंबंध होते. मुलीच्या नातेवाईकांना प्रेमसंबंधाबाबत माहिती पडल्याने मुलीने तरुणाला प्रेमसंबंधास नकार दिला. तेव्हा तरुणाने अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. वारंवारच्या या धमकीच्या भितीने १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात समोर आली आहे. घटनेच्या अकरा दिवसानंतर याप्रकरणी मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाविरोधात शुक्रवारी सायंकाळी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वी मुलीची २३ वर्षीय तरुणासोबत ओळखी झाली. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळले. एकेदिवशी मुलगी तरुणासोबत फोनवर बोलत असताना नातेवाईकांना हा प्रकार लक्षात आला. नातेवाईकांनी मुलीला विश्वासात घेवून नेमका प्रकार काय आहे, याबाबत विचारले असता, मुलीचे तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. मुलगी ही अल्पवयीन असल्याने तसेच गावात बदनामी होईल म्हणून नातेवाईकांनी मुलीची समजूत घातली, त्यानंतर मुलगी आणि तरुणामधील प्रेमसंबंध तुटले.

    ठाण्यात गुंडगिरी चालू, महिलांना मारायची दिघेंची, बाळासाहेबांची शिकवण नाही | रोशनी शिंदे


    ‘माझ्या सोबतचे तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन’

    नातेवाईक तसेच कुटुंबियांना प्रकार माहिती पडल्यानंतर मुलीने तरुणास प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. मात्र, यानंतर तरुण हा प्रेमसंबंध ठेवण्यासाठी मुलीला आग्रह करत होता. प्रेमसंबंध तोडले तर माझ्यासोबतचे तुझे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करेन, अशी धमकीही संशयित तरुण मुलीला वारंवार देत होता. तरुणाकडून धमकी देत वारंवारचा त्रास आणि बदनामीच्या भितीने २९ मार्च रोजी मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली होती.

    विवाहबाह्य संबंधांतून सुखी संसाराची माती, नवऱ्यानं बायको अन् मुलाला संपवलं, अ‍ॅसिड ओतलं अन्…
    याप्रकरणी सुरुवातीला पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती, अकरा दिवसानंतर शुक्रवारी सायंकाळी याप्रकरणी तरुणाविरोधात पहूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.

    नववीत नापास झाला, गावाबाहेर जाऊन व्हिडिओ बनवला, म्हणाला – मला आता या जगात राहायचे नाही, अन्

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed