बाहेर नेल्यावर काही वेळानंतर शाम पुन्हा पुलावर आला आणि पुलावरून थेट गिरणा नदीपात्रात उडी घेतली. पुलावरून पडल्यानंतर शामचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती तालुका पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे, चेतन पाटील, होमगार्ड अशोक वाघ यांनी यांनी घटनास्थळी भेट दिली. आणि पंचनामा केला. दरम्यान, याठिकाणी काम करणाऱ्या काही वाळू उपसा करणाऱ्या मजुरांमुळे ओळख पटली. त्यानुसार पोलिसांनी टाकळी येथील शामच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
शेंदूर अन् लोण्यापासून बनलेली हनुमानाची सुंदर मूर्ती; उन्हाळ्यातही वितळत नाही लोणी
मोठ्या भावाच्या मृत्यूने लहान भावावर दुःखाचा डोंगर
शामच्या पश्चात लहान भाऊ व दोन विवाहीत बहिणी असा परीवार आहे. शामचे आई-वडील दहा वर्षांपूर्वीच आजारपणामुळे वारले आहेत. त्यामुळे शाम आपल्या भुरा भील या लहान भावासोबत गावात राहत होता. सकाळी मजुरी करून दोन्ही भाऊ आपला उदरनिर्वाह करत होते. आई वडिलांनंतर मोठा आधार असलेल्या शामच्या मृत्यूमुळे त्याचा लहान भाऊ भुरा भील यांच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.