• Sat. Sep 21st, 2024
संकटावर मात करत धाराशिव ते न्यूयॉर्कपर्यंत धडक, ग्लोबल गोदावरीची अनोखी प्रेरणादायी गोष्ट

वयाच्या १५व्या वर्षी विवाह झाला. पदरी दोन मुलं असतानाच २०व्या वर्षी पती श्रीधर यांचं अपघातात निधन झालं. गोदावरी यांच्यावर जणू आकाशच कोसळलं. एक अडीच वर्ष आणि एक ६ महिन्यांचा अशी दोन मुलं पदरात…त्यांचं शिक्षण आणि जगायचं कसं हा प्रश्न गोदावरी यांच्यासमोर समोर उभा होता. शिवाय स्वत:चं शिक्षण केवळ ७वी पर्यंत त्यामुळे त्यांचा टिकाव कुठेही लागणं कठीण होतं. अडीच वर्षे पतीच्या आठवणीमुळे गोदावरी घरी होत्या. शिवाय मानसिक संतुलन बिघडलं होतं. त्यांना त्यांच्या आणि मुलांच्या भविष्याची चिंता सतावत होती. अशा अडचणीच्या काळात गोदावरी यांना स्वयं शिक्षण प्रयोग (SSP) संस्थेचा आधार मिळाला. आई विजयाबाई डांगे, अनिता कुलकर्णी, SSP संस्थापक प्रेमाताई गोपालन यांनी त्यांना स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेत आणलं. जिद्ध आणि जगण्याची धडपड असल्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि आपल्यासारख्या असंख्य महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या गोदावरी डांगे-क्षीरसागर यांचा ग्लोबल गोदावरी बनण्यापर्यंतचा यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवास.

​महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात राहणाऱ्या गोदावरी ताई​

​महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात राहणाऱ्या गोदावरी ताई​

गोदावरी या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात राहतात. तुळजापुर तालुक्यातील गंधोरा येथील राहणाऱ्या गोदावरी यांना धाराशिव येथील स्वयं शिक्षण प्रयोग (SSP) संस्थेद्वारे महिला स्वयं-मदत केंद्रात काम करण्याची संधी मिळाली आणि प्रशिक्षण घेतलं. इतर स्त्रियांबरोबर काम करत असताना समस्यांची ओळख झाली आणि गोदावरी यांचा जणू नव्याने जन्म झाला.

​ग्रामीण भागात पहिली महिला फेडरेशन स्थापन

​ग्रामीण भागात पहिली महिला फेडरेशन स्थापन

गोदावरी यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा कसा असतो याचं वर्णन अत्यंत सोप्या भाषेत केलं आहे. लोकांना जनावरासारखं मरताना मी पाहिलं आहे, त्यांना खाण्यासाठी अन्नही नसायचं आणि त्यांना स्वत:ला जिवंत ठेवण्याचा कोणताही मार्ग नसायचा. २०१२ ते २०१५ या कालावधीत मराठवाडयात तीव्र दुष्काळ पडला होता. अशावेळी हजारो शेतकरी महिलांना एकत्र करून भाजीपाला आणि धान्य पीक घेऊन, गावातील धान्याची कमतरता भरून काढली. महिलांची आर्थिक स्थिती आणि नेतृत्व गुण वाढवण्यासाठी ग्रामीण भागात पहिली महिला फेडरेशन स्थापन केली. आज या फेडरेशनमध्ये १० हजार महिला सदस्य कार्यरत आहे.

​गोदावरी यांना पुरस्कार

​गोदावरी यांना पुरस्कार

इक्वेटर पुरस्कार मिळवणारी स्वयं शिक्षण प्रयोग ही देशातील एकमेव संघटना आहे. विविध देशांतील १५ अन्य विजेत्यांना सुध्दा हा पुरस्कार मिळाला त्यात गोदावरी यांना पुरस्कार मिळाला आहे. त्यांना न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेत पाठवलं आहे. गोदावरीताई यांनी केनिया, फिलिपाईन, इटली, नेपाळ, अमेरिका, तुर्कस्थान, जिन्हिवा, ब्राझील, बँकॉक, जपान, जर्मनी, अमेरिका, इंडोनेशिया, मलेशिया, बँकॉक, अमेरिका, इजिप्त अशा अनेक देशात अभ्यास दौरे, मार्गदर्शनसाठी त्या गेल्या आहेत.

​​महिला सक्षमीकरणासाठी कार्य

​​महिला सक्षमीकरणासाठी कार्य

तसंच गुजरात राज्यातील बचत गटातील महिलांना मार्गदर्शन, तामिळनाडू राज्यात आलेल्या त्सुनामी गावात महिला आरोग्य आणि व्यवसाय कश्याप्रकारे करतात हे पाहण्यासाठी दौरा केला आहे. तसंच बिहार, ओरिसा, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यात महिला सक्षमीकरणासाठी त्या कार्य करत असतात.

​स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थेचा पुढाकार

​स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थेचा पुढाकार

कोरोना काळामध्ये स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थेने लोकांना धान्यकिट आणि मास्क, साबण, सॅनिटायझर वाटप केलं. १० हजार मायग्रेट लोकांना रेशन मिळवून दिलं. २३ हजार लोकांना MRGS चं काम मिळवून दिलं. लॉकडॉऊनमध्ये प्रत्येक गावात लिडर महिलांना कोविड बाबत मार्गदर्शन केलं. या काळात लसीकरण करणं गरजेचं आहे. लसीकरणाचं महत्त्व पटवून देत गाव लिडर मार्फत गावात जनजागृती केली. लॉकडॉऊनमध्ये ज्या महिलांचे व्यवसाय बंद पडले आहेत आणि ज्या महिला व्यवसाय करत आहेत त्या व्यवसायाला प्रोत्साहन म्हणून महिलांना फेडरेशनने एक टक्का दराने कर्ज वाटप केलं. अनेक गावांत शेळी पालन, कुक्कटपालन, सेंद्रिय शेती, भाजी, कडधान्यं, दुध-डेअरी सुरू करण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन केलं. आज या महिला महिना १० ते २० हजार रुपये कमवतात.

‘माझ्यावर आलेली वेळ कोणावरही येऊ नये’

माझ्यावर आलेली वेळ कोणावरही येऊ नये

महिलांना अर्थिक दृष्ट्या सक्षम करणं, महिलांना मुख्य प्रवाहात आणणं, समाजातील अबला, निराधार महिलांना सक्षम करायचं आहे. माझ्यावर जी वेळ आली ती वेळ समाजातील कोणत्याच महिलावर येऊ नये. आज माझी दोन्ही मुलं मोठी झाली आहेत, कमावती झालेली आहे. आता मला त्यांची चिंता नाही, पुढील आयुष्य महिलासाठी काम करणार असल्याचं गोदावरी डांगे – क्षिरसागर यांनी सांगितलं.

गोदावरीताईंचा प्रेरणादायी प्रवास

गोदावरीताईंचा प्रेरणादायी प्रवास

गोदावरीताईंनी वक्तृत्व आणि नेतृत्व गुण संपादन केले. त्याचबरोबर त्यांनी महिलांना संघटित करण्याचंदेखील काम केलं. ग्रामीण भागात एकसंघ ग्रुप तयार होत नाहीत, सर्व महिलांना एकत्र आणत त्यांना नवीन प्रयोगाबद्धल चर्चा करून फायदे सांगणं, त्याचं महत्त्व पटवून देणं खूपच आव्हानात्मक असतं, महिलांना केवळ संघटित केलं नाही, तर त्यांना घेऊन आरोग्य, कुपोषण आणि दैनंदिन आरोग्यासाठी त्यांनी आंदोलनंदेखील केली आहेत. गोदावरी ताईंचा हा प्रवास तरुणाईलाही नक्कीच प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed