दरम्यानच्या काळात अल्पवयीन मुलगी आणि आरोपीमध्ये काही कारणावरून वाद झाला. यानंतर अल्पवयीन मुलीने आरोपीशी बोलणं बंद केलं. त्यानंतरही आरोपीने तिचा छळ सुरू केला आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यातूनच आरोपीने अल्पवयीन मुलीच्या नातेवाईक आणि मित्रांना अनेक फोटो पाठवले. नातेवाईकांनी ते फोटो अल्पवयीन मुलीच्या आईला पाठवले. यानंतर आईने चौकशी केली. यात अल्पवयीन मुलीने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित आईने मुलीसह केळवद पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
काही गोष्टींची काळजी घ्या
सोशल मीडियावर आपण अनेकदा ऐकतो की आधी मैत्री, मग डेटिंग, मग प्रेम आणि नंतर फसवणूक. अशा परिस्थितीत अनेकांची मनं दुखावली जातातच. पण आर्थिक फसवणूकही होते. म्हणूनच काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
– समोरच्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर लगेचच तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका. उदाहरणार्थ, घराचा पत्ता, फोन नंबर इत्यादी
– जर तुमची मैत्री नुकतीच सुरू होत असेल तर सीमा निश्चित करा. तसेच, समोरची व्यक्ती तुमच्या संदेशाचा फायदा घेऊ शकते
– जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत तुमचे वैयक्तिक फोटो शेअर करू नका
– ऑनलाइन डेटिंग संबंधांना फार गांभीर्याने घेऊ नका. कारण हे तुमचे खरे जग नाही
– मुलींची अनेकदा त्यांची प्रशंसा केली की, ते त्यांचे हॉट आणि सेक्सी फोटो मुलांना पाठवतात. परंतु काही मुले त्याचा गैरवापर करू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे