अजित याचे सातार्यात मोबाईल शॉपीचे दुकान आहे. अधूनमधून तो बदली चालक म्हणून काम करत होता. गुरुवारी पुणे येथील एक भाडे मिळाल्याने सकाळी तो लवकर गेला होता. रात्री सज्जनगडावर जात असताना तिसऱ्या वळणावर कार डोंगराच्या दरीत कोसळून अपघात झाला. यावेळी अजित यांच्या अंगावरून दोन दगड गेल्याने जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सज्जनगड घाटातून कार दरीत कोसळली असल्याचा फोन अजित याच्या कुटुंबियांना आला. त्यानंतर त्यांची धावाधाव सुरू झाली. अपघातात सुमारे ८०० फूट खोल डोंगर दरीत कार कोसळली होती. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने रवाना झाले. तेथे पोहोचल्यानंतर पाहणी केली असता गाडी खोल दरीत असल्याने आणि मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे तपास कामाला अडथळा येत होता.
पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शोधमोहिम राबवण्यात आली. यावेळी कारी येथील ग्रामस्थांनी पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली. मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी तो सातारा येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. दुपारनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची फिर्याद श्रीकांत नामदेव शिंगरे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. ए. दळवी अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. गुरुवारी रात्री एसटी आणि दुचाकीच्या धडकेत तीन युवकांचा अपघात झाला होता. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. ते पुण्यातील पुरंदर तालुक्यातील होते.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या