• Mon. Nov 25th, 2024
    Weather Alert: राज्यात ४८ तासांत मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

    मुंबई : राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे असून आज हलके गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा, वाशिम, येवतमाळ, अमरावती, अकोला, एनजीपी आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी प्रतितास पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर अकोल्यातही काही ठिकाणी गारपिटीने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुढचे २४ तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण आणि गोवा आणि पुढे पश्चिम किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही भागांवर मेघगर्जनेच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    बजरंगबली की जय! हनुमान जयंतीला साक्षात मारूतीरायाचं दर्शन, अख्खी वानरसेना बसली पंगतीला; पाहा VIDEO
    आज पश्चिम विदर्भात गारपीटची शक्यता वर्तवण्यात आली असून काही शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

    अकोला शहरासह अनेक भागात तुरळक पाऊस…

    प्रादेशिक हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार, अकोला जिल्ह्यात शनिवार ८ एप्रिलपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच दरम्यान प्रतितास ३० ते ४० किमी. प्रमाणे वादळवारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या इशार्‍यानंतर आज अकोला शहरासह विविध भागात तुरळक पाऊस सुरू आहे. याशिवाय ३० ते ४० किमी. प्रमाणे वादळवारा वाहत आहे.

    गर्लफ्रेंड आईच्या फोनवर वापरत होती इन्स्टाग्राम, चुकून लेकीचेच पाहिले न्यूड फोटो; विचारताच हादरली…
    दरम्यान, आता या कालावधीत अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षित ठेवावा. मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. विजा व गारांपासून बचाव करावा. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निर्गमित केल्या आहेत. या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार एस.पी.ढवळे यांनी केले आहे.

    आज, उद्या ७ व ८ एप्रिलला विदर्भातील सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात (विजा आणि) गडगडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. आज पश्चिम विदर्भात पावसाचा जोर राहिल तर उद्या पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त राहिल अशी शक्यता हवामान शास्त्रध्य प्रा. अनिल बंड यांनी व्यक्त केली आहे. तसेच आज यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

    भावाने शॉर्ट हेअर केले म्हणून रागाने तापला १३ वर्षीय चिमुरडा, १६व्या मजल्यावरून घेतली उडी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed