• Mon. Nov 25th, 2024
    मुंबईहून ठाणे अंतर कमी होणार; मोक्याच्या ठिकाणी होतायेत तिहेरी उड्डाणपूल, असा होईल फायदा

    मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत नवे तीन उड्डाणपूल लवकरच सुरू होणार आहेत. या तीन उड्डाणपुलांचं एमएमआरडीएने नियोजन केलं आहे. चेंबूर येथील छेडा नगर जंक्शन येथील अतिशय वाहतुकीच्या मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास या पुलांमुळे मदत होणार आहे. घाटकोपर येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे (EEH) वरील प्रमुख जंक्शन असलेल्या छेडा नगर येथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या मार्गावर तीनपैकी एक एक महत्त्वाचा उड्डाणपूल पूर्ण झाला आहे. या पुलामुळे घाटकोपर ते मानखुर्द लिंक रोड (GMLR) ते EEH कडे येणाऱ्या वाहनांसाठी सिग्नल फ्री कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

    तिहेरी उड्डाणपूल प्रकल्प सुरू होण्यापूर्वी छेडा नगर जंक्शन येथून सायनहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी एकच उड्डाणपूल होता. त्यामुळे ट्रॅफिकची मोठी समस्या येत होती.

    विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ; एकाच रिक्षात १५ ते २० विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास

    अशा प्रकारे, गोरेगाव मुलुंड लिंक रोड येथून उजवीकडे जाण्यासाठी वाहने सिग्नलवर थांबतात. त्यामुळे उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होते. या वाहतूककोंडीमुळे गोरेगाव मुलुंड लिंक रोड ते मुलुंडपर्यंत वाय ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी होते.

    विलेपार्लेतील ‘हा’ पूल रात्री १ ते पहाटे ४ या वेळेत बंद राहणार; ‘या’ दोन पुलांचा पर्यायी वापर करा
    कोणत्या मार्गावर असणार तीन उड्डाणपूल?

    पहिला फ्लायओव्हर छेडा नगर फ्लायओव्हर आणि अमर महाल इथे कनेक्टेड असेल. हा मार्ग सुरू करण्यात आला आहे. दुसरा मार्ग छेडा नगर जंक्शन इंडियन ऑईल ते गोरेगाव मुलुंड लिंक रोड ते ठाणे ते ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असा असणार आहे. हा मार्ग लवकर सुरू केला जाईल.

    तर तिहेरी उड्डाणपुलामधील तिसरा मार्ग अमर महाल – विक्रोळी असा असेल.

    तिहेरी मार्गासाठी खर्च

    पहिल्या मार्गाची लांबी ६५० मीटर आणि यात दोन लेन असणार आहेत. या मार्गासाठी ५२ कोटींचा खर्च करण्यात आला. हा मार्ग मार्च २०२२ मध्ये सुरू करण्यात आला.

    दुसऱ्या मार्गाची लांबी १.२ किलोमीटर असून दोन लेन असणार आहेत. यासाठी ९४ कोटींचा खर्च होणार असून हा मार्ग या एप्रिल महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे.

    पुन्हा टोलच्या मार्गावर; महसूलवाढीसाठी टोलवसुली करण्याचा ‘एमएमआरडीए’चा प्रस्ताव
    तिसऱ्या मार्गाची लांबी ६८० मीटर असून या मार्गावर तीन लेन असतील. यासाठी ५८ कोटींचा खर्च येणार आहे.

    हा तिहेरी उड्डाणपूल प्रकल्प कित्येक वर्ष रखडला होता. जुलै २०१८ मध्ये तिहेरी उड्डाणपूल प्रकल्पाचं काम सुरू झालं. पहिल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी जवळपास पाच वर्ष इतका कालावधी लागला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *