• Sat. Sep 21st, 2024

कुनो नॅशनल पार्कमधून आणखी एक चित्ता भरकटला, थेट गावात पोहोचला, वन अधिकारी चिंतेत

कुनो नॅशनल पार्कमधून आणखी एक चित्ता भरकटला, थेट गावात पोहोचला, वन अधिकारी चिंतेत

मध्य प्रदेशः श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमधून एक चित्ता त्याचा अधिवास सोडून गावाजवळील शेतात भरकटला होता. चार दिवस उलटूनही या चित्त्याला परत आणण्यात वन विभागाला यश आलेलं नाहीये. त्यातच आता नॅशनल पार्कमधील आणखी एक मादी चित्ता क्षेत्रातून बाहेर पडली आहे. या दोन्ही चित्त्यांना मुक्त संचार क्षेत्रात परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ओवान आणि आशा अशी या दोन चित्त्यांची नावं असून १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडलं होतं. या दोघांचे नावदेखील पंतप्रधान मोदींनी ठेवलं होतं. ११ मार्च रोजी दोघांनाही कुनो राष्ट्रीय उद्यानातील मुक्त संचार क्षेत्रात सोडण्यात आले होते. रविवारी सकाळी उद्यानाजवळील एका गावातील शेतात एक चित्ता फिरत असल्याचे निदर्शनास आले होते. ओबान हा चित्ता बडोदा गावाजवळीच शेतात भटकत होता. तर बुधवारी आशा नावाची मादी चित्ता कुनो पार्कमधून बाहेर भरकटली आहे. आशा शिवपूरी जिल्ह्याच्या दिशेने जात असल्याची खबर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लागली आहे.

मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’ची सुपरसेव्हर योजना, पासदरात कपात; शुक्रवारपासून असतील असे दर
शिवपुरी जिल्ह्यातील लोकांना गावात चित्ता आला तर त्याच्याशी सामना कसा करावा याचे प्रशिक्षण देण्यात आले नाहीये, त्यामुळं वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून ओवान कुनोलगतच्या गावात फरत आहे. तो कधी शेतात तर कधी नदीवर पाणी पिताना दिसत आहे. तो आत्तापर्यंत रहिवासी भागापासून दूर आहे. ओवान आणि आशा डार्टिंगच्या माध्यमातून बेशुद्ध करुन पुन्हा कुनो राष्ट्रीय उद्यानात आणू शकतो का या शक्यतेचा विचार करण्यात येत आहे.

मुंबईतून चिंता वाढवणारी बातमी, ‘या’ उच्चभ्रू भागात रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक, असे आहे चित्र
नामिबियातून आणले चित्ते

सप्टेंबर २०२२मध्ये नामिबियातून ‘केएनपी’मध्ये आणलेले आठपैकी चार चित्ते आतापर्यंत जंगलात सोडण्यात आले आहेत. ओबान आणि आशा यांना ११ मार्च रोजी जंगलात सोडण्यात आले. ‘रॉकस्टार’ म्हणून ओळखले जाणारे एल्टन आणि फ्रेडी यांना २२ मार्च रोजी जंगलात जाण्याची परवानगी देण्यात आली. आठ नामिबियन चित्त्यांमध्ये पाच माद्या आणि तीन नरांचा समावेश आहे.

हात-पाय धुण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरले, इतक्यात पाय घसरला; दोन मित्रांचा दुर्दैवी अंत

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, शिवसेना महिला कार्यकर्त्यांवर आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed