• Sat. Sep 21st, 2024
दोन मित्र पोहायला गेले; अल्पवयीन मुलगा बुडाला, कोल्हापूरच्या राजाराम बंधारा येथील दुर्दैवी घटना

कोल्हापूर: कोल्हापुरात एका बाजूला चैत्र यात्रा सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र पोहण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे घडली. माहीर इम्रान पठाण (वय १०, राहणार लाईन बाजार कसबा बावडा) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. तो आणि त्याचा मित्र मानव गणेश कांबळे (वय वर्ष १२ राहणार आंबेडकर नगर कसबा बावडा कोल्हापूर) हे दोघेही पोहण्यासाठी गेले होते. मात्र, मानव कांबळेला वाचवण्यात यश आले असून त्याला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, माहीर इम्रान पठाण आणि मानव गणेश कांबळे हे दोघे मित्र शाळेत जात होते. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास दोघेही कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदी पात्रात पोहण्यासाठी आले. दरम्यान, माहीर आणि मानव या दोन्ही मित्रांनी बंधाऱ्याच्या बाजूला असलेल्या नदीपात्रात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडू लागले. जीव वाचवण्यासाठी ते आरडाओरडही करू लागले.

नदीत मासे पकडायला गेले, पण हाती खजिना लागला; सर्वत्र बियर तरंगताना पाहून मच्छिमार भलतेच खूश
दरम्यान मुलांचा आरडाओरडा ऐकून मासे पकडत असणाऱ्या तरुणाने नदीपात्रात उडी घेतली आणि मानव गणेश कांबळे याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, मानवच्या नाका तोंडात पाणी गेल्यामुळे त्याचं बोलणं बंद झालं होतं. स्थानिकांनी त्वरित अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली आणि अग्निशमन दलाची गाडी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मानवला अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

शिर्डीतील रामनवमी यात्रेत ब्रेक डान्स पाळणा अचानक तुटला; पाच जण गंभीर जखमी, चालकाचा हलगर्जीपणा

दरम्यानच्या काळात बावडा रेस्क्यू फोरचे जवान देखील घटनास्थळी दाखल झाले. माहीर इम्रान पठाणची शोध मोहीम सुरू झाली आणि दुपारी सव्वादोन च्या सुमारास कसबा बावडा बावडा रेस्क्यू फोर्सचे जवान नितीन माने, राहुल भोजने आणि संग्राम जाधव यांनी माहीर याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. माहीर याच्या पश्चात भाऊ आणि आई असून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंगणात जेवताना बिबट्याचा हल्ला, उचलून शेतात नेलं, लचके तोडले; ९ वर्षांच्या सुरेशने तडफडून जीव सोडला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed