• Mon. Nov 25th, 2024

    पाठलाग करून सरपंचांना संपवणाऱ्या मुख्य आरोपींना बेड्या; शिरगाव येथे घडला होता हत्येचा थरार

    पाठलाग करून सरपंचांना संपवणाऱ्या मुख्य आरोपींना बेड्या; शिरगाव येथे घडला होता हत्येचा थरार

    मावळ, पुणे : मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची चार दिवसांपूर्वी भर चौकात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी आता मुख्य आरोपींना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय २५), संदीप उर्फ अण्णा छगन गोपाळे (वय ३१) आणि ऋतिक शिवाजी गोपाळे (वय २२) सर्व राहणार शिरगाव, अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. यापैकी विशाल गायकवाड हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. अद्याप या हत्येचे मूळ कारण समोर आलेले नाही.

    शिरगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे यांची शनिवारी १ एप्रिलला प्रतिशिर्डी साई बाबांच्या मंदिरासमोर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. प्रवीण गोपाळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते. काही महिन्यांपूर्वी शिरगाव ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली होती.

    Pune : मावळमधील शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, चौघांना अटक
    गोपाळे हे प्लॉटिंगचा व्यवसायही करत होते. त्यातून ही हत्या झाली का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. १ एप्रिलला शनिवारी रात्री सव्वानऊच्या दरम्यान प्रवीण गोपाळे हे आपल्या दुचाकीला टेकून मित्राशी बोलत होते. यावेळी प्रवीण गोपाळे नेमके कोणते? याची शहानिशा करण्यासाठी या आरोपींनी काही वेळ त्यांची रेकीही केली होती. त्यानंतर अचानक आरोपी विशाल, संदीप आणि ऋतिक यांनी दुचाकीवर त्यांच्याजवळ येऊन त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. त्यानंतर सरपंच गोपाळे जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या तोंडावर सपासप वार केले आणि त्यांची हत्या केली. घटनेनंतर तिन्ही आरोपी दुचाकीवरून पसार झाले होते. त्यांना पहाटे तीनच्या सुमारास शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अटक केली. या घटनेने मावळ तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    फडणवीस म्हणाले गुन्हेगारी कमी झाली, रोहित पवारांनी थेट ‘त्या’ हल्ल्याचा VIDEO पुरावा दाखवला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *