नवी मुंबईः नवी मुंबईकरांना आता लवकरच गारेगाव आणि जलद प्रवास अनुभवता येणार आहे. नवी मुंबई मेट्रो २ सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व चाचण्या झाल्या आहेत मात्र उद्घाटनासाठी मुहूर्त सापडत नसल्याचं समोर आलं आहे. सिडको प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार येत्या एप्रिलपर्यंत सेवा सुरु करण्यात येईल. १२ वर्षांपूर्वी मेट्रोचं काम सुरु करण्यात आलं होतं. पेंधर ते बेलापूर या मार्गावर पहिल्या टप्प्यात मेट्रोचं काम सुरु होतं. मात्र काही अडथळे निर्माण झाल्यामुळं सिडकोने महामेट्रोच्या हाती मेट्रोची जबाबदारी दिली होती. त्यानंतर नवी मुंबईतील मेट्रोच्या कार्याला गती आली असून या महिन्यातच सिडको नवी मुंबईकरांसाठी मेट्रो खुली करण्याची शक्यता आहे. नवी मुंबईकरांची प्रतीक्षा आता संपणार आहे. लवकरच त्यांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. (Navi Mumbai Metro Line 1)नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सिडको नवी मुंबई मेट्रो अंतर्गत ४ उन्नत मार्ग विकसित करत आहे. नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा हा बेलापूर ते पेंढार हा ११.१ किमीचा मार्ग असून, तळोजा येथे ११ स्थानके आणि कार डेपो आहे. बेलापूर ते पेंढार या फेज-१ च्या कामाचे कंत्राट महामेट्रोला देण्यात आले होते.
असे असतील तिकिट दर
सिडकोचे एमडी डॉ. संजय मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई मेट्रो१ मध्ये प्रवासादरम्यान २ किमीच्या अंतरासाठी १० रुपये इतकं भाडे असेल. तर, २ ते ४ किमीसाठी १५ रुपये भाडे असेल. ४ ते ६ किमीसाठी २० रुपये, ६ ते ८ किमीसाठी २५ रुपये, ८ ते १० किमीसाठी ३० रुपये आणि १० किमी साठी अधिकचे ४० रुपये भाडे द्यावे लागणार आहे.

मेट्रो लाइन १ ची स्थानके
बेलापुर
सेंट्रल पार्क
पांचनंद
पेंढर टर्मिनल
पेठा पाडा
साइंस पार्क
सेक्टर-७ बेलापुर
सेक्टर-११ खारघर
सेक्टर-१४ खारघर
सेक्टर-३४ खारघर
उत्सव चौक
अजिंक्यतारा, सज्जनगडावर होणार ‘रोप वे’; आमदार शिवेंद्रराजेंसह अधिकाऱ्यांनी केली पहाणी