याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ४ एप्रिलला संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पुनर्वसन शिवारातील शेता समोरील आपल्या घराच्या अंगणात सुरेश भाईदास वसावे हा नऊ वर्षीय मुलगा जेवण करत होता. त्यावेळी अचानक बिबट्याने सुरेशवर हल्ला केला आणि त्याला जवळच्या अमेरिकन मक्याच्या शेतात नेऊन गंभीरित्या जखमी केले. त्यामुळे सुरेशचा जागेवरच मृत्यू झाला. सदर बालकाच्या पृष्ठभागावर तसेच मानेवर बिबट्याने लचके तोडले. यामध्ये या मुलचा जागीच मृत्यू झाला.
बार्शीतील निर्भया प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकरांचा फोन पीडित कुटुंबाला फोन करून धीर
मुलाच्या शरिरातील पूर्ण रक्त पिलं
बिबट्याने मुलाच्या शरीरातील पूर्ण रक्त पिऊन घेतल्याने शरीर कोरडे पडले होते. दरम्यान, मुलाच्या काकूने आरडाओरड करून सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, वन विभागाचे वनक्षेत्रपाल एल डी गवळी, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत आदींनी घटनास्थळावर धाव घेऊन मुलाचा शोध घेतला. घटनेनंतर वन विभागाने जागेवर पंचनामा करून सदर बालकास शवविच्छेदनासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हलविले.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष परमार यांनी शव विच्छेदन केले.
आमदार आमश्या पाडवी चार तास तिथेच थांबून
आमदार आमश्या पाडवी यांनी पूर्ण घटना स्थळाची पाहणी करुन अधिकारी आणि मुलाच्या पालकांसह ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथे वैद्यकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी आणि वन अधिकाऱ्यांसोबत आवश्यक चर्चा करुन मुलाच्या कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सुचना दिल्या. आमदार आमश्या पाडवी यांनी तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ थांबून यंत्रणेकडून संपूर्ण पुर्तता करुन शव कुटुंबियांच्या ताब्यात दिले. त्यांना घरी पोहचवण्याची व्यवस्थाही केली.