नवी मुंबईः नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२४मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. तर बाकीचे टप्पे पुढील १५ वर्षांत विकसित केले जाणार आहेत. विमानतळ सुरु झाल्यानंतर प्रवासी वाहतूक सोप्पी व्हावी यासाठी एमएमआरडीएने मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्राने जोडण्याची योजना आखली आहे. या प्रस्तिवित मेट्रो मार्गामुळं १२० मिनिटांचा प्रवास अवघ्या ३० मिनिटांवर येणार आहे. सिडको आणि एमएमआरडीए या दोन्ही संस्था संयुक्तपणे या मार्गाचे काम पाहणार आहेत. नवी मुंबई परिसरात शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) हे काम पाहणार आहे तर, मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीए या कामाची पाहणी करणार आहे. मेट्रो ८ कॉरिडॉरमुशं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी नवी मुंबई विमानतळ जोडले जाणार आहेत. २०१४पासून एमएमआरडीए या मेट्रो मार्गासाठी प्रयत्नशील आहे. जवळपास ३५ किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग भुयारी असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर सात स्थानकं असतील. तसंच, दररोज नऊ लाख प्रवासी प्रवास करु शकणार आहेत.
आई-वडिलांना घेऊन लेक निघाला, समृद्धी महामार्गावर घडला अपघात, एका क्षणात मुलगा पोरका झालानवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा हा २०२५मध्ये कार्यान्वित होईल. त्याआधी मेट्रो ८ कॉरिडॉरची अंमलबजावणीची योजना आखण्यात येत आहे. जेणेकरुन विमानतळावरील वाहतूक वाढेल तेव्हा हा मार्ग प्रवाशांसाठी वापरात येईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रस्तावित मेट्रो मार्ग हा भूमिगत आणि उन्नत या दोन्ही स्वरुपात असणार आहे. घाटकोपर येथे अंधेरी ते पूर्व द्रुतगती महामार्गादरम्यान हा मेट्रोमार्ग भूमिगत असेल. तर, तेथून घाटकोपर- मानखुर्द लिंकरोडमार्गे मानखुर्दपर्यंत उन्नत मार्ग असेल. या मार्गावर २० ते ३० मिनिटांनी मेट्रोची एक फेरी असेल. विमानाच्या वेळांनुसार फेऱ्यांची वारंवारता असेल, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
ठाणे स्थानकात आता रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचाही थांबा, स्थानकात प्रवाशांना मिळतील या सुविधा
एमएमआरडीएने सिडकोला नवी मुंबई मेट्रो १ मार्गावरील मानखुर्द ते सागर-संगम आणि बेलापूर ते नवी मुंबई विमानतळ या मेट्रो ८ मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले होते. हा प्रकल्प भूमिगत असल्याने तो राबविणे आव्हानात्मक असेल. मेट्रोसाठी तिसऱ्या मानखुर्द-वाशी खाडी पुलाचे बांधकाम खर्चिक आणि वेळखाऊ होणार आहे. हा पूल २ किमी लांबीचा असेल., असं काही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
एक्स्प्रेस हाय वे ते रेल्वेचं जाळं, मुंबई-पुण्याला लाजवणाऱ्या प्रकल्पाने नांदेडची ताकद वाढवली