पुनर्विकासाला कारण की…
मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि ट्रान्स हार्बर या दोन्ही मार्गिका ठाणे स्थानकात एकत्र येतात. स्थानकाच्या दोन्ही दिशेला मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून ठाणे शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. यामुळे भविष्यातील गर्दी सुलभपणे हाताळता यावी, यांसह पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारे नवे पर्याय उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ठाणे स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकत्या रस्त्याचा पर्याय
ठाणे स्थानकातील गर्दीचे वेगाने हाताळण्यासाठी १७ सरकते जिने, २० लिफ्ट, ३ ट्रॅव्हलेटर (सरकता रस्ता) या आधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत.
सुविधा कोणत्या?
– ठाणे स्थानकावरील फलाटावर ५५ हजार चौरस मीटरचे डेक उभारण्यात येणार आहेत. स्थानकातील अतिरिक्त गर्दी नियंत्रणासाठी सशुल्क आणि मोफत क्षेत्र उभारण्यात येणार आहे.
– फेरीवाल्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांच्या नोंदणीकरून रेल्वे हद्दीत व्यवसाय करण्यासाठी संबंधितांना ओळखपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
– फलाटावरील रेल्वे कार्यालय बाहेर स्थलांतरित करण्यात येणार आहे.
– स्थानकात चारही दिशेने प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. यामुळे एकाच ठिकाणी होणारी गर्दी कमी होण्याची आशा आहे. याशिवाय सध्याच्या प्रवेशद्वारासह एकूण ९ प्रवेशद्वार प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
बहुमजली वाहनतळ
– १५०० दुचाकी
– ३८४ चारचाकी
चार टॉवरची उभारणी होणार
टॉवर १ (पूर्वेकडील सॅटिस इमारत): २८०० चौ.मी
टॉवर २ (प्लॅटफॉर्म एकच्या बाहेर: २८०० चौ. मी
टॉवर ३ (सॅटिस पश्चिमेला): २००० चौ.मी
टॉवर ४ (रेल्वे कॉलनी): २५०० चौ.मी
रेल्वे स्थानक परिसरात हेलिपॅड
स्थलांतरित रेल्वे वसाहतीमध्ये उभारल्या जाणाऱ्या इमारती आणि पूर्वेकडील सॅटिस इमारत अशा दोन जागा हेलिपॅडसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. यापैकी एका इमारतीच्या छतावर हेलिपॅड प्रस्तावित आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत याचा वापर करण्यात येणार आहेत.
ठाणे स्थानक
– क्षेत्रफळ: १.१० लाख चौरस मीटर
– फलाट आणि रेल्वे रुळ व्यापलेली जागा- ८३,३०० चौ.मी
– रेल्वे वसाहती आणि कार्यालये – २०, ००० चौ.मी
– स्टेशन क्षेत्र सुधारणा योजना (SATIS): ६,७०० चौ.मी
ठाणे स्थानकातील आजची वर्दळ
– रोजचे प्रवासी – साडेसहा लाख
– एकूण फलाट – १०
– रेल्वे गाड्यांची संख्या – १००० जास्त
– मुख्य, ट्रान्स हार्बर, मालगाड्या आणि मेल-एक्स्प्रेस यांचा समावेश
– मुंबई-कल्याण-नवी मुंबई-घोडबंदर मार्गे बोरिवली/वसई आणि कळवामार्गे पुणे यांसाठी मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणजे ठाणे