• Mon. Nov 25th, 2024
    बायकोच्या उपचराचे पैसे दिले नाही, नवऱ्याची सटकली, मेहुण्यांवर वार, अन् मग

    अकोला: नवऱ्याने बायकोच्या दोन सख्ख्या मावस भावांवर चाकुने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर झाला असून जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव इथे अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे. आपल्या दोन भावांसह मिळून जावयाने त्याच्या दोन मेहुण्यांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्यानंतर दोघांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं. उपचारा दरम्यान यातील एकाला आपले प्राण गमवावे लागले. चेतन शामराव काळदाते (वय २७ रा. आलेगाव, ता. पातूर, जि. अकोला) असं मयत तरुणाचं नावं आहे. दवाखान्याच्या बिलावरून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अकोल्यातील चान्नी पोलीस तपास करीत आहे.

    काय आहे संपूर्ण घटना?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत आलेगाव येथील शिवाजी चौकात दोन सख्ख्या भावावर धारदार शास्त्राने हल्ला चढविण्यात आला होता. ही घटना २९ मार्चला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात चेतन शामराव काळदाते आणि दीपक शामराव काळदाते हे दोघे भाऊ गंभीर झाले. त्यांना लागलीच अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात काळदाते कुटुंबांयांनी चान्नी पोलिसांत तक्रार दिली की, आलेगाव येथील महादेव प्रल्हाद धात्रक, गणेश प्रल्हाद धात्रक आणि दीपक प्रल्हाद धात्रक या तिघां भावांनी चाकूने हल्ला करून चेतन आणि दीपक या दोघांना जखमी केले आहे.

    आई उठ ना, माकडिणीच्या मृतदेहाजवळ पिल्लाचा टाहो; रुग्णवाहिका चालकामुळे मिळाले जीवदान
    त्यानंतर या प्रकरणात तिघांवरही मारहाण तसेच हल्ला चढ़विल्या-प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली त्यानंतर न्यायालयाने तिघांना जामीन मंजूर केलाय. दरम्यान हल्ल्याच्या दिवशीपासून गंभीर जखमी असलेल्या दोन्ही भावांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता. अखेर सोमवारी चेतन काळदाते याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चान्नी पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे करतायत.

    शिर्डीतील रामनवमी यात्रेत ब्रेक डान्स पाळणा अचानक तुटला; पाच जण गंभीर जखमी, चालकाचा हलगर्जीपणा

    या कारणांमुळे घडलं हत्याकांड

    आलेगाव इथं महादेव प्रल्हाद धात्रक, गणेश प्रल्हाद धात्रक, दीपक प्रल्हाद धात्रक यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील गणेश धात्रक याचा विवाह गावातीलच रहिवासी असलेले चेतन शामराव काळदाते (मृत) आणि दीपक शामराव काळदाते यांच्या सख्ख्या मावस बहिणी सोबत झाला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गणेशची पत्नी म्हणजेच चेतनची बहीण आजारी पडली. गणेश हा बाहेरगावी गेला असल्यामुळे तिला उचारार्थ चेतन आणि दीपक काळदाते या दोघां भावांनी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात तिच्यावर उपचार पार प्रक्रिया पार पडल्यानंतर तिच्यात सुधारणा झाली अन् तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र त्यावेळी चेतनने (मृत) रुग्णालयाचे बिल न भरल्यामुळे रुग्णालयाचे पैसे गणेशाला द्यावे लागले.

    मित्रांसह पोहताना पाण्याचा अंदाज चुकला, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, वैद्यकीय क्षेत्रात भरारीचं स्वप्न अधुरं
    या किरकोळ कारणावरून गणेश धात्रकने चेतन तसेच त्याचा भाऊ दीपक याच्यासोबत वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी गणेश धात्रक याचे दोन भाऊ दीपक आणि प्रल्हाद धात्रक हे दोघेही घटनास्थळी दाखल झाले. अन् तिघांनी मिळून चेतन आणि दीपक काळदाते या दोघांना मारहाण करून चाकूने वार केले. या हल्ल्यात चेतनच्या छातीवर गंभीर दुखापत झाली. तर दीपकच्या पाठीवर दुखापत झाली. या दोघांनाही रुग्णालयात उपचारसाठी दाखल केल्यानंतर आज उपचार घेत असलेला चेतन याचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed