प्रसाद शिंदे, अहमदनगर : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाच्या दरवाढीची गेल्या पाच महिन्यांपासून वाट पाहिली. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे विविध मार्गानं दरवाढी साठी आवाज उठवला. राज्यातील काही नेत्यांनी देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू मांडत दरवाढीचा मुद्दा मांडला. मात्र, गतवर्षी कापसाला एका क्विंटलला १३ हजार ते १४ हजार रुपये दर मिळाला होता. त्या तुलनेत यंदा चार ते पाच हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. कापूस उत्पादक शेतकरी आता दरवाढीच्या मुद्यावर आक्रमक होत असल्याचं चित्र आहे. विदर्भ, मराठवाड्या प्रमाणं आता अहमदनगरच्या शेवगावमधील कापूस उत्पादक शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत. कापसाला चांगला दर मिळावा, अनुदान मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कापसात गाडून घेत आंदोलन केलं आहे.
अखतवाडे तालुका शेवगाव येथील शेतकऱ्यांनी आज अनोखं आंदोलन केलं आहे. केंद्र सरकारकडे अनेक वेळा मागणी करून देखील कापसाला प्रतिक्विंटल चार हजार रूपये अनुदान न मिळाल्याने अखतवाडे येथील संतप्त शेतकऱ्यांनी येथे स्वतःला कापसात गाडून घेत सरकारचा निषेध व्यक्त केला. सकाळी नऊ वाजता अखतवाडे येथे शेतकरी विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत स्वतः कापसात गाडून घेतलं.

अहमदनगर जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड झाली आहे. मधल्या काळात अतिवृष्टीचा पाऊस पडल्याने कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती. एक एकरातून कापूस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे २५ ते ३० हजार रूपये खर्च येतो. परंतु, सध्या बाजारात कापसाला मिळत असलेला भाव ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल हा उत्पादकांना न परवडणारा आहे असं आंदोलकांनी म्हंटलं आहे.
केंद्र सरकारकडे अनेक वेळा मागणी करून देखील कापसाला प्रतिक्विंटल चार हजार रूपये अनुदान मिळाले नाही, असं शिवराज कापरे या शेतकऱ्यानं सांगितलं. कापसाच्या दरात वाढ न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.