• Sat. Sep 21st, 2024
थाटामाटात लग्न झालं, देवदर्शनावरुन येतानाच काळाचा घाला, अपघातात नवदाम्पत्य जागीच ठार

सांगली : इस्लामपूर येथील एक नवदाम्पत्य अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटक राज्यातील हलूर जवळील जत-जांबोटी महामार्गावर हा भीषण अपघात घडला आहे. लग्नानंतर देवदर्शन करून परतत असताना काळाने नवदाम्पत्यावर घाला घातला. इंद्रजीत मोहन ढमणगे (वय २९) आणि कल्याणी इंद्रजीत ढमणगे (वय २४) असं मृत्यूमुखी पडलेल्या नवदाम्पत्याचं नाव आहे तर या अपघातात मृत इंद्रजीतचे आई-वडील जखमी झाले आहेत.

इस्लामपूर येथील इंद्रजीत यांचा १८ फेब्रुवारी रोजी कल्याणी हिच्याशी विवाह झाला होता. अगदी थाटामाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नानंतर या नवदाम्पत्यांनी आपल्या कुलदैवत असणाऱ्या कर्नाटक राज्यातल्या शाकांभरी देवीच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. त्यानुसार इंद्रजीत आणि कल्याणी आणि इंद्रजित याचे आई-वडील देवदर्शनाकरिता गेले होते.

विहिरीचं काम सुरु, अचानक वरचा भाग ढासळला, ५ कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली, दोघांना बाहेर काढलं
देवीचे दर्शन घेवून परतत असताना गुर्लापूर ता. मुडलंगी जवळ त्यांची गाडी सुखरुपपणे आले. त्याच वेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकची आणि इंद्रजीत यांच्या कारची समोरा-समोर धडक झाली. ज्यामध्ये इंद्रजित व कल्याणी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने दोघे नावदाम्पत्य जागीच ठार झाले. तर इंद्रजीतचे वडील मोहन व आई मिनाक्षी हे गंभीर जखमी झाले आहेत.

शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. मृत कल्याणी यांचे माहेर इचलकरंजी आहे, तर इंद्रजीत हे मुंबई येथे टीसीएस कंपनीत नोकरीस होते. रविवारी पहाटे इस्लामपूर येथे नवदाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मृत इंद्रजीतचे जखमी वडील मोहन व आई मिनाक्षी यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed