याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील हा गेल्या सहा महिन्यापासून श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी येथे त्याच्या मावस भावाकडे रहात होता. मात्र तो कामानिमित्त १ एप्रिल रोजी शिरूर तालुक्यातील गुणाट येथे आला होता.
दुसऱ्या दिवशी पावणेबारा वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने सुनीलचा भाऊ बापू थोरात यांना फोन करून सांगितले की, तुझा लहान भाऊ सुनील याचा मृतदेह निमोणे येथील निलायम हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या विहिरीत तरंगताना दिसत आहे.
त्यावर सुनील यांच्या भावाने तातडीने विहिरीत जाऊन पाहिले तर तो मृतदेह सुनील याचाच असल्याची त्यांना खात्री पटली. याबाबत त्यांनी शिरूर पोलिसात फिर्याद दिली आहे.
विहिरीत मृतदेह सापडल्याने हा नक्की घातपात आहे, अपघात आहे की आत्महत्या अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
रामनवमीला डीजे लावण्यास पोलिसांनी रोखलं; दोन युवक थेट विषारी औषध प्यायले
गेल्या काही दिवसांपासून सुनील त्याच्या मावसभावाकडे रहात होता. मात्र १ एप्रिलला तो गावाकडे का आला, याचा तपास केला जात आहे. नागरिकांकडून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
निमोणे हे गाव शिरूर तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेले गाव आहे. त्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.