• Mon. Nov 25th, 2024

    कोर्टाकडून तारखांवर तारखा, आरोपी वैतागला, रागाच्या भरात थेट न्यायाधीशांवरच चप्पल भिरकावली

    कोर्टाकडून तारखांवर तारखा, आरोपी वैतागला, रागाच्या भरात थेट न्यायाधीशांवरच चप्पल भिरकावली

    Mumbai News Today: आरोपीनेच न्यायाधीशांवर चप्पल फेकल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

     

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः दोन गुन्ह्यांमध्ये सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लवकर लागत नसल्याने संतापलेल्या आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल फेकल्याची घटना शनिवारी कुर्ला येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात घडली. याची तत्काळ दखल घेत पोलिसांनी चप्पल भिरकावणारा आरोपी जावेद सुभाष शेख ऊर्फ प्रदीप सुभाष तायडे (४०) याला अटक केली.मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरमध्ये राहणाऱ्या सुभाष याच्यावर ना. म. जोशी मार्ग आणि ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सुभाषने पाच वर्षे शिक्षा भोगली, मात्र दुसऱ्या गुन्ह्यातील खटला काही संपत नसल्याने न्यायालयाच्या फेऱ्या मारून तो कंटाळला होता. १ एप्रिलला कुर्ला येथील महानगर दंडाधिकारी अ. अ. धुमकेकर यांच्या समोर उभे राहिल्यानंतर त्याने प्रलंबित खटल्याचा निकाल लागत नसल्याने नाराजी व्यक्त केली. वारंवारच्या फेऱ्यातून मुक्त करावे, अशी मागणी करीत त्याने न्यायालयात गोंधळ घातला. इतकेच नाही तर संतापाच्या भरात पायातील चप्पल काढून महानगर दंडाधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावली.

    या प्रकारानंतर न्यायालयात असलेल्या पोलिसांनी सुभाषला ताब्यात घेतले. त्याच्यावर कुर्ला पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, तसेच इतर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *