कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हा कोल्हापूर शहरालगत मोक्याच्या ठिकाणी उभा आहे. कारखान्याची स्वमालकीची १७ एकर जमीन विरोधकांना खुणावते आहे. कसबा बावड्यातील बहुतांश भूखंड लाटणाऱ्यांना आता राजारामच्या सातबारावर स्वतःचे नाव लावायचे आहे, असा आरोप अमल महाडिक यांनी केला आहे. दरम्यान, आम्हाला धमकी द्यायची नाही, आम्ही कुस्ती खेळत आलोय, खेळणार आणि जिंकणारही असे प्रत्युत्तर त्यांनी आमदार सतेज पाटील यांना दिले.छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त सत्तारूढ सहकार आघाडीकडून पन्हाळा तालुक्यात व इतर अनेक ठिकाणी बैठका झाल्या. यामध्ये आमदार महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला. प्रचाराचा नारळ फुटल्याने आता आरोप प्रत्यारोपांना धार आली आहे. यामुळे राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. एकीकडे प्रत्येक मतासाठी फिल्डींग लावली जात असताना १२२ गावातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महाडिक म्हणाले, साहेब, आम्हाला धमकी द्यायची नाही. आम्ही कुणाला धमकी देत नाही. आम्ही राजाराम कारखाना लोकशाही पद्धतीने चालवत आहोत. येथे सहकार जपला आहे. त्यामुळे कुणीही धमकीची भाषा करू नये. १८९९ सभासदांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. तोच खरा काळा दिवस होता. गेल्या दोन निवडणुकीत ही शेवटची निवडणूक म्हणून आमदार पाटील सांगत आहेत, खोट बोल पण रेटून बोल ही त्यांची निती आहे. प्रत्येक गावात जाऊन दिशाभूल सुरू आहे.

कारखान्याचे माजी संचालक डॉ. कीडगावकर यांनी सभासदांचा कळवळा आल्याचा फार्स करणाऱ्या विरोधकांचा कावा आता सभासदांनी ओळखला आहे असं नमूद केले. सर्जेराव माने आणि सतेज पाटील यांची जोडी म्हणजे खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळची जोडी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी संतोष पाटील, पांडुरंग पाटील, सरपंच बाजीराव पाटील, बळवंत करचे, वसंत गोरे, शिवाजी पाटील, भिवाजी कोले, पांडुरंग पाटील, मोहन हेर्डेकर, युवराज पाटील, शंकर पाटील, हरिश्चंद्र हेर्डेकर, रोहन गुरव,अमर धनवड, बाजीराव पाटील (नाना) इंद्रजीत पाटील उपस्थित होते.