कल्याण: ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने अश्लील नृत्यू सुरू असलेल्या लेडीज बारवर कोळसेवाडी पोलिसांच्या पथकाने छापेमारी केली असता कशिश बारमध्ये तब्बल २८ बारबाला अश्लिल नाच करताना आढळून आल्या आहेत. पोलिसांनी त्या बारबालांना ताब्यात घेऊन बारमध्ये अय्याशी करणाऱ्या ग्राहकांसह बारचे मालक आणि कर्मचाऱ्यासह २३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख आणि डीबी पथकाचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कल्याण पूर्वेतील नांदिवली गावाच्या हद्दीत असलेल्या ‘कशिश’ बारवर गुरुवारी ३० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अचानक छापेमारी केली. त्यावेळी एका हिंदी गाण्यावर तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करत ग्राहकांसमोर बारबालांचा नाच सुरु होता. या छापेमारीत पोलिसांनी २८ बालबालांसह इतरांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ऑर्केस्ट्रा बारमध्ये केवळ ४ गायिकांना ठेवण्याची परवानगी असताना तब्बल २८ बारबाला बारचालकाने ठेवल्या होत्या. शिवाय बारबाला आकर्षक आणि तोकडे कपडे घालून अश्लील नाच करत होत्या.
‘मेरे रश्के कमर’ गाण्यावर कैद्याचां तुफान डान्स; मुंबई मध्यवर्ती कारागृहात मनोरंजनाच्या कार्यक्रमाची चर्चा
कशिश बारमध्ये बारचे चालक – मालक, कर्मचारी आणि ग्राहकांकडून त्या बारबालांना अश्लील नृत्य करण्यास संगनमताने प्रोत्साहित केल्याप्रकरणी, तसेच ऑर्केस्ट्रा बारमध्ये नाचण्यास प्रतिबंध असल्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात २८ बारबालांसह बार मालक समेश्वर बहादूर उमाशंकर सिंह, मॅनेजर, वेटर , ग्राहक अशा २३ पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.
नवी मुंबईत एका कोंबडीमुळे १९ वर्षीय तरुणाचा जीव गेला, चोरांकडून कुऱ्हाडीचे घाव, तडफडत जीव सोडला
या घटनेने कल्याण-डोंबिवली शहरातील ऑर्केस्ट्रा बारमध्ये सर्रासपणे बारबालांना नाचवले जात असल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही ‘कशिश’ डॉन्स बारवर पोलीस पथकाने ७ वेळा छापेमारी केल्याचे सांगितले जात आहे.
मुलाकडे ३० कोटींची संपत्ती, पण आम्हाला शिळी चपाती देतो, IAS च्या आजी-आजोबांनी आयुष्य संपवलं