• Sat. Sep 21st, 2024

खेळण्यासाठी गोट्या घेतल्या, सायकलवरून आयुष घराकडे निघाला, भर चौकात जीव गेला

खेळण्यासाठी गोट्या घेतल्या, सायकलवरून आयुष घराकडे निघाला, भर चौकात जीव गेला

Yavatmal News : एका १० वर्षाच्या मुलाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

 

yavatmal news
खेळण्यासाठी गोट्या घेतल्या, सायकलवरून आयुष घराकडे निघाला, पण भर चौकात जीव गेला…
यवतमाळ : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एका १० वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहरातील शनी मंदिर चौक परिसरात घडली. आयुष आत्राम (वय १० रा. तारपूरा) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी शहर पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आला.आयुष खेळण्याकरिता गोट्या घेऊन सायकलने घराकडे परतत होता. बस स्टँड चौकाकडून पांढरकवडा रोडकडे जाणाऱ्या (एमएच २६ एच-८७५७) या क्रमांकाच्या ट्रकने भरधाव वेगाने येऊन शनी मंदिर चौक रोडवर सायकलवरील बालकाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की सायकलस्वार बालक जागीच ठार झाला या अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांनी प्रचंड हळहळ व्यक्त केली. शुक्रवारी ३१ मार्चला संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.
गुढीपाडव्याच्या दिवशी शोककळा! बोलेरो पिकअपची एसटी बसला धडक, २ मुलींचा मृत्यू; १० प्रवासी गंभीर जखमी
याप्रकरणी निलेश शेषराव आत्राम यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या मार्गावर दररोज सुसाट वेगाने जड वाहनांची वाहतूक होते. विशेष म्हणजे लोहारा चौकात आणि बस स्थानक चौकात पोलीस चौकी आहे. त्यानंतरही जड वाहन रेस लावल्याप्रमाणे भरधाव वेगाने पोलिसांच्या डोळ्यादेखत वाहनं भरधाव चालवतात. तसंच यामुळे इतर वाहन चालकही वेगाने वाहनं चालवतात.

थायलंडहून आणलेल्या फुलांची विदर्भात शेती; मातीविनाचं रोपांची लागवड, अन् पहिल्याच वर्षी नऊ लाखांचं उत्पन्न

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed