धंतोली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फॉर्च्युन मॉलच्या पायऱ्यांवर रामनवमीनिमित्त झांकी पाहण्यासाठी आलेली महिला कुटुंबासह बसली होती. ही महिला आजारी असल्याने ती जिन्यावर आराम करत होती.या आजारी महिलेला 3 महिलांसह एकाने धक्काबुक्की करून मारहाण केली. ढकलल्यानंतर तोल गेल्याने ही महिला पायऱ्यांवरून खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. संतोषी रामकिशोर बिनकर ,(बालाजीनगर, मानेवाडा )असे मृत महिलेचे नाव आहे. संतोषी मेडिकल कॉलेजमध्ये हेड नर्स म्हणून कार्यरत होत्या.पोलिसांनी ४ आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्यात या तीन आरोपी महिला दिसल्या आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच आरोपी व्यक्तीसह या तिन्ही महिला बेपत्ता झाल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या महिलांबाबत काही माहिती असल्यास तत्काळ धंतोली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रामनवमीला मिरवणुकांचं आयोजन
नागपूर शहरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नागपूर शहरात यंदा देखील रामनवमीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, दोन कुटुंबात झालेल्या घटनेनं या मिरवणुकीला गालबोट लागलं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?