• Mon. Nov 25th, 2024
    मोठी बातमी! कोरोनात मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास ५० लाख मंजूर

    सोलापूर : कोरोना काळात मृत्यू पावलेले कंत्राटी कर्मचारी प्रशांत ओहोळ यांच्या आईवडिलांना राज्य शासनाने ५० लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते माता आशा ओहाळ व पिता परमेश्वर ओहाळ यांना मंजुरीचा आदेश प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाने यासाठी विशेष प्रयत्न केले होते. राज्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली ही पहिली मदत आहे. राज्य शासनाकडून मृताच्या मदतीचा आदेश मिळताच मृताच्या आईवडिलांना अश्रू अनावर झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांत्वन करत ५० लाख रुपये मंजूर झाल्याचा आदेश हातात दिला.पुत्रवियोगाने आईला अश्रू अनावर

    कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुलाच्या निधनानंतर शासनाकडून ५० लक्ष रुपयांचा आदेश घेताना कंत्राटी कर्मचारी दिवंगत प्रशांत ओहोळ यांची आई आशा ओहोळ व वडिल परमेश्वर ओहोळ यांना अश्रू अनावर झाले. मदतीचा आदेश हातात मिळताच त्यांनी अश्रूंद्वारे आपल्या दुःखाला मोकळी वाट केली. सीईओंच्या दालनात पाठीमागील बाजूस जाऊन त्या ढसाढसा रडल्या.

    दुर्दैवी! ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन जात असताना अचानक झाला ब्रेक फेल, तरुण ट्रॉलीखाली दबला
    जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी होते उपस्थित होते

    कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचा आदेश देताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, राज्य ग्रामसेवक संघाचे राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील, सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संघाच्या पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ मिटकल, माढा तालुक्यांतील पालवण ग्रामपंचायतीचे अतुल क्षीरसागर, माजी सरपंच परमेश्वर पाटील, आई आशा ओहोळ, वडिल परमेश्वर ओहोळ, भाऊ तेजस ओहोळ, महाराष्ट्र कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, प्रशासन अधिकारी जहीर शेख, आपले सरकार सेवा केंद्रांचे महावीर काळे उपस्थित होते.

    तुला काय करायचे ते कर, मी मोबाईलचे हप्ते भरत नाही जा, असे म्हणत तिघांचे धक्कादायक कृत्य
    कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील मदतीचा हात – सीईओ दिलीप स्वामी

    कोरोना काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून खूप मोठ्या प्रमाणावर कामे करून घेण्यात आली होती. प्रशांत ओहोळ हे देखील कंत्राटी कर्मचारी म्हणून डेटा इन्ट्रीचे काम करत होते. कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. शासकीय काम करीत असताना मृत्यू झालेले ते पहिलेच कंत्राटी कर्मचारी होते. त्यांच्या वारसांना ५० लक्ष रुपयांची मदत करण्यात आली आहे, असेही सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. राज्यातील पहिल्यांदाच एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

    पनवेलमध्ये खळबळ! शिवकर गावातील १९ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला, गमावला जीव
    सोलापूर जिल्हा परिषदेने केलेल्या पाठपुराव्यास यश

    कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली होती. सोलापूर जिल्ह्यातील आठ कर्मचाऱ्यांनी मुदतीत प्रस्ताव सादर केले होते. त्यांपैकी पालवण तालुका माढा येथील संगणक परिचालक प्रशांत ओहोळ यांचा प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून तत्कालीन गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्यात आला होता. तो मंजूर होऊन सानुग्रह अनुदान ५० लाख रुपयांचा आदेश देण्यात आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *