शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न – अंबादास दानवे
रात्री झालेल्या परिस्थितीला पोलीस आयुक्त देखील जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मागील पंधरा दिवसापासून पोलिसांना शहरात एमआयएम आणि भाजप हे दोन्हीही आपलं राजकारण करण्यासाठी परिस्थिती खराब करू शकतात अशी माहिती दिली होती. इतकंच नाही तर मंत्रालयात देखील अशा पद्धतीची माहिती दिली होती, मात्र त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळेच रात्री अशी परिस्थिती घडलेली आहे, या हल्ल्यात पोलीस देखील जखमी झालेले आहेत, पोलिसांची वाहनं जाळण्यात आलेली आहेत. त्यामुळे प्रकरण गंभीर असल्याने कोणाचीही हयगय करू नये आणि दोषींना तातडीने पकडावं अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
फेरीवाल्यांमुळे राजू पाटील आक्रमक, मनसैनिक रस्त्यावर उतरले
गोंधळ घालणाऱ्यांना रात्री पर्यंत अटक करू – पालकमंत्री संदिपान भुमरे
किराडपुरा येथे गोंधळ घालणाऱ्या लोकांना रात्रीपर्यंत ताब्यात घेतलं जाईल. कुठलीही हयगय केली जाणार नाही, असं आश्वासन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिलं. मध्यरात्री दोन गटात वाद झाल्यानंतर काही वाहन राम मंदिर परिसरात जाळण्यात आली होती. त्यानंतर संदिपान भुमरे यांनी सकाळी परिस्थितीचा आढावा घेत पोलिसांना योग्य ते निर्देश दिले.