• Thu. Nov 28th, 2024
    अशी वेळ कुठल्याही माऊलीवर नको; बाईकवरच तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आईच्या कुशीत अंग टाकलं

    नाशिक : दुचाकीवर असताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील तरुणाच्या पोटात दुखू लागल्याने त्याला दवाखान्यात नेण्यात येत होते. मात्र बाईकवर असतानाच हार्ट अटॅक आल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोल प्रकाश शिरसाठ (वय ३० वर्ष, रा. सोनांबे) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, काल सायंकाळी आपल्या राहत्या घरात असताना अचानक अमोलच्या पोटात दुखू लागले. ही गोष्ट त्याने आपल्या घरच्यांना सांगितली असता काका व आई त्याला उपचारासाठी दुचाकीवरून घेऊन सिन्नरकडे येत होते. काका व आईच्या मधोमध अमोल दुचाकीवर बसला होता. यावेळी घोटी महामार्गावरील बंधन लॉन्सजवळ आल्यावर त्याला हृदयविकाराचा धक्का आला. काही वेळातच त्याने अंग सोडून दिले. पाठीमागे बसलेल्या आईने कसेबसे त्याला पकडून ठेवत सिन्नरमधील खाजगी रुग्णालय गाठले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

    कोणाला कधी आणि कसे मरण येईल याचा काही नेम नसतो. असाच दुर्दैवी प्रसंग ३० वर्षीय अमोलच्या नशिबी घडला आणि दुचाकीवर त्याचा मृत्यू झाला आईच्या डोळ्यासमोरच आपल्या घरातील कर्त्या मुलाचा जीव गेला. या घटने मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत अमोल हा आईसोबत सोनांबे गावात वास्तव्याला होता. माळेगाव येथील एका कारखान्यात तो नोकरीला होता.

    ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू

    फक्त पोटात दुखत असल्याने काका आणि आईसोबत सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील तरुण उपचारासाठी दुचाकीवरून निघाला पण उपचारा आधीच रस्त्यातच त्याला मृत्यूने गाठले. जन्म दिलेल्या आईने आपल्या डोळ्यांनी ३० वर्षीय तरुण कर्त्या मुलाचा मृत्यू पाहिला. असा प्रसंग कोणी डोळ्यांनी बघितला किंवा ऐकला असता तर तो हेच म्हणेल की असा प्रसंग कोणत्याही आईच्या नशिबी न येवो.

    चिंगीला टेडीसारखी आंघोळ घालूया, दोन चिमुकल्या बहिणींचा अट्टाहास, पाण्यात बुडून बाळाचा अंत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed