• Sat. Sep 21st, 2024

गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं, पुणे जिल्ह्याला त्यांची उणीव जाणवेल : अजित पवार

गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं, पुणे जिल्ह्याला त्यांची उणीव जाणवेल : अजित पवार

पुणे : “राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाह्यलं जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.

गिरीश बापट यांचा टेल्को कंपनीतल्या कामगार नेत्यापासून सुरु झालेला प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहोचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं. १९९५ पासून २०१४ पर्यंत सलग पाच वेळा ते आमदार झाले. २०१९ ला खासदार झाले. राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातलं त्यांच योगदान कायम स्मरणात राहील. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. आजाराशी ते निर्धारनं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.

गिरीश बापटांच्या निधनाने पुण्यातील पोकळी भरुन निघणार नाही, राष्ट्रवादीचा नेता ढसाढसा रडला

गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे, असं अजित पवार म्हणाले. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गिरीशभाऊंच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

Telco कंपनीत कामगार, आणीबाणीत तुरुंगवास, पोटनिवडणुकीत पराभव पण नंतर कायमस्वरुपी ‘किंगमेकर’!

गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं! : चंद्रकांत पाटील

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीश बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं असल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, खासदार गिरीश बापट यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Girish Bapat Death: भाजप खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed