गौतमी पाटीलने कुडाळमधील कार्यक्रमात विविध गाण्यावर अदाकारी सादर केली. यावेळी तरुणाईने प्रतिसाद दिला. मात्र, कार्यक्रमावेळी संरक्षणासाठी स्टेजच्या समोर उभारलेल्या बॅरॅकेट तरुणांनी पाडून स्टेजजवळ येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलाच समाचार घेऊन सौम्य लाठी चार्ज केला.
आमदार शिवेंद्रराजे भोसले हेदेखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव स्टेजवर नाचण्याची विनंती केली असता काही वेळासाठी आमदार शिवेंद्रराजे त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्टेजवर हात वर करून थिरकलेले पाहायला मिळाले.
आमदार शिवेंद्रराजे भोसले नियमित प्रवासासाठी वापरत असलेल्या एमएच ११ सीव्ही ११११ या गाडीची प्रतिकृती केक मध्ये वापरण्यात आली होती. यावेळी शिवेंद्रराजे यांनी पाच मुलींच्या हस्ते केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते, चाहते उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा साडी चोळी देऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सन्मान केला.
दरम्यान, गौतमी पाटील यांनी इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलण्यास नकार दिला आहे. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाच्या फीवरुन इंदोरीकर महाराज यांनी नाव न घेता टीका केली होती. यासंदर्भात तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराज यांच्यावर टीका केली होती.