• Mon. Nov 25th, 2024

    पोलिसांनी प्लास्टिक कचऱ्याचा ट्रक अडवला, तपासणीत जे सापडलं त्याने पोलीसही चक्रावले

    पोलिसांनी प्लास्टिक कचऱ्याचा ट्रक अडवला, तपासणीत जे सापडलं त्याने पोलीसही चक्रावले

    धुळे : सुरत येथून मालेगाव येथे विक्रीसाठी जाणार्‍या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याची वाहतूक धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साक्रीत रोखली. ट्रकसह १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यासोबत चालकाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.प्लॉस्टीक कचरा आणि कपड्यांच्या गठ्ठया आड गुटख्याची चोरटी वाहतूक केली जात होती. याप्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरत येथुन निघालेल्या ट्रकमधून (क्र.एमएच ४१ जी ७१६५) राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा विक्री करण्यासाठी साक्री-धुळे मार्गे मालेगाव येथे नेला जात असल्याची खात्रीशीर माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ आपल्या शोध पथकाला ट्रकचा शोध घेवून कारवाईचे आदेश केले होते.

    पुणे हादरला! आधी मुलाचे अपहरण, नंतर हातपाय बांधून ट्रेनखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न
    त्यानुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकचा शोध सुरू केला. संशयीत ट्रक हा दहीवेलकडून साक्रीकडे जात असल्याचे दिसल्याने पथकाने ट्रक थांबविला. त्यावरील चालकाने त्याचे नाव शेख अस्लम शेख उस्मान (वय ४३ वर्षे, राहणार- न्यू आझादनगर, गल्ली नं. ५, मालेगाव) असे सांगितले. ट्रकमधील मालाबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे त्याला ट्रकसह साक्री पोलीस ठाण्याच्या आवारात आणले.

    ट्रकची तपासणी केली असता त्यात ९८ हजार ४०० रूपयांचा विमल सुंगधीत पानमसाला व तंबाखूचा साठा आढळून आला. त्यासह १० लाखांचा ट्रक, ५ हजारांचा मोबाईल व १ लाख १५ हजारांचा प्लास्टीक कचरा व कपड्याचे गठ्ठे असा एकुण १२ लाख १८ हजार ४०० रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

    मंत्रालयात, रेल्वेत मोठ्या जागेवर नोकरीचे आमिष, तिघांनी जळगावातील कुटुंबाला २२ लाखांना गंडवले
    या कारवाईत लाख रुपयांचा गुटखा मालेगाव शहरात विक्री करण्याच्या उद्येशाने चालक शेख अस्लम शेख उस्मान हा सुफीयान (राहणार- मालेगाव) याने ट्रकमध्ये लोड केलेला गुटखा वाहतुक करताना आढळून आला. त्यामुळे चालकासह दोघांविरुध्द साक्री पोलीस ठाण्यात पोकॉ महेंद्र सपकाळ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हवालदार संतोष हिरे, सतीष पवार, पोलीस नाईक पंकज खैरमोडे, पोलीस हवालदार महेंद्र सपकाळ यांच्या पथकाने केली.

    परमेश्वर महाराजांच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, रथाचे दगडी चाक निखळले; २ भाविकांचा मृत्यू

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *