याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यात शासकीय कार्यालयामध्ये किरकोळ कामासाठी लाच घेण्याचे प्रकार होत असल्याने लाच घेणाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जात आहे. या दरम्यान या विभागाकडून सोमवारी सैदापूर (ता. कराड) येथील मंडलाधिकारी विनायक दिलीप पाटील व मंगेश उत्तम गायकवाड (रा. सुपने, ता. कराड) या दोघांवर १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या लाचलुचपतच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली.
तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्ताच्या नोंदीवर हरकत आल्याने त्याची सुनावणीवर आदेश काढून तशी नोंद करण्यासाठी आणि सातबारा उतारा देण्याकरता १५ हजार रुपये लाचेची मागणी संबंधित आरोपींकडून करण्यात आली होती. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई केली.
१५ हजार रुपये लाचेची मागणी केल्यानंतर अखेर तडजोडीअंती मंगेश उत्तम गायकवाड (रा. सुपने, ता. कराड) यांच्याकडून १० हजार रुपये लाच स्वीकारण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सातारा पोलीस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस नाईक राजपुरे व जाधव यांनी कारवाई केली आहे. संबंधित संशयित आरोपी मंडलाधिकारी याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या कारवाईमुळं सातारा जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एसीबीच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. एसीबीच्या कारवाईची साताऱ्यात जोरदार चर्चा सुरु होती.
कापसात १० किलोंची लूट, शेतकऱ्याची तक्रार; आमदार मंगेश चव्हाणांकडून प्रकरण उघडकीस