गुजरातःबिल्किस बानो बलात्कार व हत्या प्रकरणात दोषींची सुटका झाल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. यातच आज सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या सुटकेला अव्हान करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वीच बिल्किस बानो प्रकरणातील एक दोषी शैलेश भट्ट हा दाहोदचे भाजपचे खासदार जसवंतसिंह भाभोर आणि लिमखेडाचे आमदार शैलेश भाभोर यांच्यासह एकाच मंचावर उपस्थित होता. २५ मार्च रोजी झालेल्या एका सरकारी कार्यक्रमात तो सहभागी झाला होता.हर घर जल योजनाविषयी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिंगवाड येथील करमाडी गावात हा कार्यक्रम होता. यावेळी भाजपचे खासदार जसवंतसिंह भाभोर आणि लिमखेडाचे आमदार शैलेश भाभोरसह भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते. याच कार्यक्रमात बिल्किस बानो दोषी प्रकरणातील आरोपीही मंचावर नेत्यांच्यासोबत बसला होता.
बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींच्या शिक्षेच्या माफीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाच्या विशेष खंडपीठाने सुनावणी सुरू केली असतानाच ही घटना उघडकीस आली आहे. २००२मध्ये गुजरात दंगलीवेळी बिल्किस बानोवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. तसंच, तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्याही करण्यात आली होती. बिल्किस बानोंच्या आरोपींची सुटका करण्यात आल्यानंतर न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठासमोर अनेक राजकीय आणि नागरी हक्क कार्यकर्त्यांनी दाखल केल्या होत्या. बिल्किस बानो यांनीही ११ आरोपींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

दरम्यान, गुजरातमध्ये २००२ मध्ये गोध्रा दंगल झाली होती. ३ मार्च २००२ मध्ये दाहोद जिल्ह्यातील रंधिकपूर गावात बिलकिस बानो यांच्यांवर सामूहिक बलात्कार झाला होता. तर, त्यांच्या कुटुंबातील सात लोकांची हत्या करण्यात आली होती. बिलकिस बानो यांच्यावर बलात्कार झाला त्यावेळी त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला गर्दी, पोलिसांनी केला लाठीचार्ज