• Sat. Sep 21st, 2024
शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती,पीकअपमधून विमानतळावर तिथून तिरुपतीला गेले,अनोख्या सहलीची चर्चा

बारामती : विमानाने एकदा तरी प्रवास करावा, अशी इच्छा बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील शेतकऱ्यांची होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिरूपती बालाजी देवस्थानच्या दर्शनाचा दौरा या शेतकऱ्यांनी ठरवला. त्यासाठी दोन पीकअप भरून ३४ पुरूष व महिला थेट पुणे लोहगाव येथील अंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेव्हा या शेतकऱ्यांचे येथील कर्मचारी व इतर प्रवाशांना देखील कौतुक वाटले.

तिरूपती बालाजीला विमानाने जायचा निर्णय गावातील ३४ शेतकऱ्यांनी घेतला. त्यांच्यासमवेत सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, पोलीस पाटील राजकुमार लव्हे, नितिन लव्हे, दिलीप लव्हे आदी सहभागी झाले. हे सर्व शेतकरी दोन पीकअप जीप करून लोहगाव विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानतळावर उपस्थित असणाऱ्यांना इतर प्रवाशांना पीकअपमधून विमान प्रवासासाठी आलेल्या शेतकऱ्यांचं आश्चर्य वाटलं.

या शेतकऱ्यांचा विमानतळावर उतरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विमानाने प्रवास करण्यासाठी निघताना या साध्या माणसांनी आपले जास्त पैसे स्थानिक प्रवासाला जाऊ नयेत, असा विचार करून दोन पीकअप मधून जाण्याचं ठरवलं एखाद्या लग्नाचे वऱ्हाड जावे तसे हे शेतकरी पिकअप मधून विमानतळावर पोहोचले. आकाशात उडणाऱ्या विमानाचे नेहमीच आकर्षण असते. फिरायला किंवा देवदर्शनाला जायचे असल्यास सर्वसामान्य शेतकरी कुटूंबे एसटी बसचा पर्याय निवडतात. फारफार तर चारचाकी अथवा एखादी मिनीबस ठरवतात. मात्र बाबूर्डी गावातील शेतकऱ्यांनी केलल्या या प्रवासाची चांगलीच चर्चा झाली. तसेच या विमान प्रवासामध्ये असलेले वृद्ध चांगलेच हरखून गेले होते.
मोठी बातमी! भाजप आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

या विमान प्रवासाला प्रत्येकी सहा ते साडेसहा हजार रुपये खर्च आला. प्रत्येकाने आपला प्रवास खर्च स्वतः केला. या प्रवासामध्ये महिला व वृद्धांची संख्या होती. पहिल्याच विमान प्रवासात वृद्ध व महिला हरपून गेल्या. आकाशातून पृथ्वीचे दिसणारे विहंगम दृश्य पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले… तीन दिवसाच्या या सहलीत दररोज शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी देव दर्शनासोबत पर्यटनाचा सुद्धा आनंद घेतला…

मुंबई-नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट, फडणवीसांनी समृद्धी महामार्गाबाबत दिली मोठी अपडेट
आयुष्यात एकदातरी विमानाने प्रवास करावा अशी इच्छा होती. आमची विमान प्रवासाची हौस पूर्ण झाली असून समाधान वाटले असल्याचं जाईबाई वसंत लव्हे यांनी सांगितलं.

प्रश्न नगरचा, मंत्र्यांच्या उत्तरात गुवाहाटीचा उल्लेख, राष्ट्रवादीच्या नेत्याने बच्चू कडू यांच्या जखमेवरची खपली काढली!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बारामती दौऱ्यावर, पवार-गडकरींसोबत अजितदादा, सुप्रियाताईंची उपस्थिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed