• Mon. Nov 25th, 2024
    रंगपंचमीदिवशी दुर्दैवी घटना, सख्खे भाऊ गेले, कुटुंबाचा काळीज चिरणारा हंबरडा

    अहमदनगर : आज सर्वत्र रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी केली असताना श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे घरासमोरील शेततळ्यात बुडून दोघा लहान भावांचा मृत्यू झाला. आई-वडील घरी नसताना रविवारी दुपारी हे दोन चिमुकले शेततळ्याजवळ खेळत असताना पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला.

    आर्यन बंडोपंत साळुंखे (वय ९) व अनिकेत बंडोपंत साळुंखे (वय ८) अशी त्यांची नावे आहेत. लोणीव्यंकनाथ ते येळपणे रस्त्यावर बंडोपंत साळुंखे राहतात. रविवारी दुपारी ते पत्नीसह दुसऱ्याच्या शेतात कामाला गेले होते. त्यावेळी त्यांची मुले घरीच खेळत होती.

    साळुंखे यांनी घरासमोरच शेतीच्या पाण्याची सोय म्हणून शेततळे केले आहे. आर्यन व अनिकेत हे दोघे भाऊ रविवारची सुट्टी असल्याने घरीच होते. आठ दिवसांपूर्वीच्या त्यांच्या घरासमोर शेततळे करण्यात आले आहे. उत्सुकतेपोटी ते तेथे खेळायला गेले आणि तळ्यात पडले.

    काही वेळात परिसरातीस लोकांच्या लक्षात आले. त्यामुळे परिसरातील युवकांनी तळ्यात उतरून त्या दोघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याची माहिती त्यांच्या आई-वडिलांना देण्यात आली. ते धावतच शेतातून घरी आले. आपल्या चिमुकल्यांचे मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed