• Sun. Sep 6th, 2026

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सद्गुरू गोदड महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 11, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सद्गुरू गोदड महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन – महासंवाद

अहमदनगर, दि .11 मार्च (जि.मा.का. वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्जतचे ग्रामदैवत असलेल्या सद्गुरू गोदड महाराज मंदिरास भेट देत त्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले,माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली. देवस्थानच्यावतीने फेटा, शाल व स्मृतिचिन्ह देऊन उपमुख्यमंत्री महोदयांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्जत येथील पीर हजरत दावल मलिक हेलिपॅडवर येथे आगमन झाले.
यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,प्रा. राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील,आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ कर्जत शहरातील व जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed